फक्त १०० रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा

रेशनकार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे (रेशनकार्ड धारकांना मिळणार आनंदचा शिधा).

यासंदर्भात शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल तर यासाठी लेखाची शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे या बटणावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही सविस्तर माहिती बघू शकता. 

हा जीआर दिनांक 12 जुलै 2024 रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे.

यापूर्वी सुद्धा बऱ्याच पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात आलेला होता. हा शिदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वितरित करण्यात आलेला होता.

रेशनकार्ड धारकांना मिळणार आनंदचा शिधा शासन निर्णय बघा

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रधान्य कुटुंब शिधापत्रिका व छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील व नागपूर विभागातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ज्यांच्याकडे केशरी शिधापत्रिका आहे अशा पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच १,७०,८२,०८६ शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

हा आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानुसार या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा अंतर्गत कोणते धान्य मिळणार कसे मिळणार व कोठे मिळणार ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

गौरी गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे हा अनुजा शिधा वितरित करण्यात येणार आहे यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर तेल त्या प्रमाणात दिल्या जाणार आहे.

आनंदाचा शिधा दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच हा संपूर्ण कालावधी एका महिन्याचा असणार आहे. या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. हा शिधा ई पास प्रणालीनुसार वितरित करण्यात येणार आहे तसेच शंभर रुपये प्रतिसाद या धरणे वितरित करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती या जीआरमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून बघायचा असेल तर खाली दिलेल्या डाउनलोड करा या बटनावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता व संपूर्ण माहिती बघू शकता.

महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा

Leave a Comment