तुमची ई पिक पाहणी झाली का e pik pahani online status check

शेती संदर्भात विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पिक पाहणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असेल तरच शेतकऱ्याला पिक विमा व इतर बऱ्याच योजनांचा लाभ दिला जातो.

ही पिक पाहणी करण्यासाठी शासनाच्या वतीने प्ले स्टोर ई पीक पाहणी नावाने एक ॲप्लिकेशन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पीक पाहणी करण्याची शेवटची मुदत 23 सप्टेंबर 2024 ही ठेवण्यात आलेली आहे.

ई पीक पाहणी करणे आवश्यक असते तरच शेतकऱ्याला पिक विमा पिकांवर अनुदान नुकसान भरपाई व इतर शासकीय बऱ्याच योजनांचा लाभ दिला जातो या शेतकऱ्यांची पीक पाहणी होत नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे जर अजूनही तुम्ही पाहणी केली नसेल तर 23 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही ही पीक पाहणी करू शकता.

बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ही ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची ई-पीक पाहणी यशस्वी झाली आहे का हे आता अगदी त्यांच्या मोबाईलवर सुद्धा यादी बघू शकतात.

बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होते परंतु त्याची नोंद ही सातबारावर होत नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नाव अनुदानामधून पिक विमा मधून किंवा विविध इतर शासकीय योजनांमधून वगळण्यात येते. तुमची ई पिक पाहणी झाली आहे का झाली असेल तर त्याची नोंद सातबाऱ्यावर झाली आहे का ही माहिती बघणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांमध्ये बघू शकता.

ई पीक पाहणी झाली आहे का ही माहिती बघण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी महाभुमी या वेबसाईटवर जायचे आहे ही माहिती तुम्ही ही पीक पाहणी या ॲप्लीकेशन वरून सुद्धा बघू शकता या लेखांमध्ये आपण ई पीक पाहणी महाभुमी या वेबसाईटवरून ही माहिती बघणार आहोत.

e pik pahani online status check

ई पीक पाहणी ऑनलाईन स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला महाभूमी या वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला View summary report या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर असाल तरी ऑप्शन तुम्हाला दिसेल जर तुम्ही मोबाईलवर असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या chrome मध्ये request as desktop site या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे

View summary report या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज निर्माण होईल या ठिकाणी तुम्हाला हंगामाची यादी बघायची आहे किंवा खरीप ची यादी बघायची आहे हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करा. यानंतर विभाग निवडा जिल्हा निवडा. तालुका निवडा आणि गाव निवडा.

हे निवडल्यानंतर सर्च करा आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाची जिल्ह्याची व तालुक्यातील संपूर्ण यादी या ठिकाणी दाखवण्यात येईल जी माहिती तुम्हाला बघायची आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाही

Leave a Comment