जाणून घेवूयात गोपाल रत्न पुरस्कार 2022 संदर्भातील संपूर्ण माहिती जेणे करून तुम्हाला देखील ५ लाख रुपये पुरस्कार मिळू शकेल.
शेतकरी केवळ शेती व्यवसायच करत नाहीत तर अनेक शेतकरी शेती व्यवसायासोबत इतर शेतीपूरक व्यवसाय करत असतात. यामधीलच एक व्यवसाय म्हणजे दुग्धव्यवसाय होय. जे शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहेत त्यांना ५ लाख रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.
गोपाल रत्न पुरस्कार 2022 अंतर्गत हे ५ लाख रुपये शेतकरी जिंकू शकतात. यासाठी शेतकरी किंवा पशुपालक यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो तसेच कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो याशिवाय ५ लाखव्यतिरिक्त इतर कोणकोणते आणखी पुरस्कार पशुपालकांना मिळणार आहे या संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
गोपाल रत्न पुरस्कार 2022 पहा संपूर्ण माहिती.
अनेक शेतकरी बांधवांनकडे गाई आहेत आणि ते दुग्धव्यवसाय करतात त्यांना गोपाल रत्न परस्कार rashriya gopal ranta purskar 2022 हा अवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे.
जो शेतकरी बांधव हा अवॉर्ड जिंकेल त्याला फक्त अवॉर्ड नाही तर 5 लाख सुद्धा मिळणार आहे त्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाइनला अर्ज मागविले आहेत. जो शेतकरी बांधव किंवा पशुपालक पुरस्काराच्या अटी व नियमानुसार पात्र असेल ते या पुरस्कारासाठी लगेच अर्ज करू शकतात.
केवळ पशुपालक व शेतकरीच नाही तर कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, त्याप्रमाणे सहकारी संस्था, दुग्ध उत्पादक कंपनी देखील गोपाल रत्न पुरस्कार 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
शेतकरी किंवा पशुपालक हा ऑनलाईन अर्ज दि.10 ऑक्टोबर, 2022 पर्यंत सादर करू शकतात असे शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे.
गोपाल रत्न पुरस्कार 2022 संदर्भातील अधिक माहिती पहा
तुम्हाला जर या योजनेविषयी जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि बघा संपूर्ण माहिती.
हा पुरस्कार तीन श्रेणीमध्ये मिळणार आहे. गोपाल रत्न पुरस्कार 2022 पुरस्कार जो दिला जाणार आहे तो प्रत्येक श्रेणीमधून तीन याप्रमाणे एकूण 9 पुरस्कार देण्यात येणार आहे.
या श्रेणी खालील प्रमाणे आहेत.
१ – ५० जातींच्या गाई आणि १७ मान्यताप्राप्त जातींच्या म्हाशी ज्या शेतकरी किंवा पशुपालकांकडे आहेत असे शेतकरी किंवा पशुपालक.
२ – श्रेणीमध्ये केंद्रशासित प्रदेश, राज्य पशू विकास मंडल, राज्य दूध महासंघ, स्वयंसेवी संस्था आणि इतर खासगी संस्थांचे रेतन तंत्रज्ञ हे या पुरस्कारसाठी अर्ज करू शकतील. पण यासाठी एक अट आहे ती म्हणजे अर्जदारकडे ९० दिवसांचे कृत्रिम रेतन परीक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
श्रेणी ३- तिसऱ्या श्रेणीमध्ये दूध उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्ता त्याचप्रमाणे जे गावपातळीवर केलेले दुग्ध व्यवसायामध्ये गुंतवलेले आणि सहकारी कार्य कायद्याअंतर्गत नोडनिकृत असलेली कंपनी देखील अर्ज करू शकते. गाव पातळीवर संस्थांसाठी प्रतिदिवस १०० लिटर दूध संकलन करणे व संस्थेमध्ये किमान ५० सदस्य असणे गरजेचे आहे.
पुरस्काराचे स्वरूप
मित्रांनो नक्कीच तुम्हाला या तीनही श्रेण्या कळल्या असलतीलच आता जाजून घेऊयात पुरस्काराचे स्वरूप .
पुरस्काराचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.
मुख्य प्रश्न म्हणजे या पुरस्काराची प्रथम,द्वितीय आणि तृतीय इनामी रक्कम काय ?
पुरस्काराची मिळणारी रक्कम खालील प्रमाणे आहे.
पहिल्या क्रमांकासाठी ५ लाख रुपये.
दुसऱ्या क्रमांकासाठी ३ लाख रुपये.
तिसऱ्या क्रमांकासाठी २ लाख रुपये.
या पुरस्कारसोबत गुणवत्ता प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देखील मिळणार आहे. तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला देखील 5 लाख रुपये पुरस्कार जिंकण्याची संधी आहे. लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या.
ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास येथे क्लिक करा.