आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया डाळींब व्यवस्थापन संदर्भातील संपूर्ण माहिती. डाळिंब उत्पादन जास्त हवे असेल तर कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.
डाळिंब व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास डाळिंब शेती यशस्वी होते.
जे शेतकरी डाळिंब उत्पादन घेत आहेत त्यांच्यासाठी आजचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
डाळिंब उत्पादन घेण्यासाठी आपल्या शेतातील डाळिंबचे झाडे हे अतिशय चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे.
पुढील माहिती पण वाचा बांधकाम कामगार नोंदणी अर्जाची माहिती तपासा मोबाईलवर
डाळींब व्यवस्थापन pomegranate farming in Maharashtra
डाळींबाच्या झाडांची चांगल्या पद्धतीने निगा ठेवणे गरजेचे असते. पण काहीं शेतकरी बांधवाना या डाळींबाच्या झाडांची निगा कशी ठेवावी.
डाळिंब शेतीचे योग्य व्यवस्थापन न करता आल्यामुळे डाळींबशेतीमध्ये त्यांना अपयश येण्याची जास्त शक्यता असते.
कीड नियंत्रण आणि सूत्र कृमींचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसे करावे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेतकरी बंधुनो सूत्र कृमींचा अधिक प्रादुर्भाव हा झाडाच्या ड्रीपर खाली असलेल्या मुळावरील गाठीवरून स्पष्ट होतो.
डाळींब व्यवस्थापन मध्ये सूत्र कृमी नियंत्रन
सूत्र कृमी प्रादुर्भावातील झाडांची लक्षणे सांगायची झाल्यास झाड अन्नद्रव्याची कमतरता दाखवतात.
सुरुवातीला सूत्र कृमींच्या प्रादुर्भावामुळे झाडावर लहान गाठी दिसून येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना फुले येत नाही.
अधिक प्रादुर्भावामुळे मुळावर मोठ्या गाठी दिसून येतात.
शेतकरी बंधूंनो या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक फार्मूलेषण उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ pasilomysis, सुडोमोनास किंवा ट्रायकोडर्मा स्पेसिस शाश्वत सूत्र कृमींचे व्यवस्थापनाकरिता या जैविक घटकांचा वापर लागवडीपासून दर सहा महिन्यातून एकदा करावा.
योग्य व्यवस्थापन केले तर डाळिंब शेती फायद्याची
या सूक्ष्मजीवांचा वापर वर्षातून दोनदा बाग विश्रांतीवर सोडताना आणि बहर नियमाच्या वेळी करावा.
त्यामुळे झाडांची अन्नद्रव्य घेण्याची क्रिया झाडांची वाढ रोगाप्रती जैविक रासायनिक प्रतिकारक क्षमता सुधारते.
तसेच डाळिंबातील मर रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळते. सूत्र कृमींचा प्रादुर्भाव अधिक असल्यास विश्रांती काळात किंवा बहर नियमाच्या वेळी वर्षातून दोनदा उपाययोजना कराव्यात.
त्यामुळे फळांमध्ये अवशेष न राहता मुळावर गाठी करणारे सूत्र कृमींची संख्या नुकसान पातळीपेक्षा कमी राहते.
डाळिंब शेतीमुळे रोजगार निर्मिती शक्य
उपाययोजना करताना दाणेदार सूत्र कृमी नाशक फ्लूएनसल्फान २ % जीआर याची ड्रीचींग करावे.
हे वापरण्यासाठी ड्रीपरच्या खाली एक छोटा गड्डा पाच ते दहा सेंटिमीटर तयार करावा. प्रति ड्रीपर दहा ग्रॅम दाणेदार रसायन वापरावे.
मात्र कमाल वापर दहा ग्राम प्रति झाडापेक्षा जास्त नसावा. त्यानंतर ते मातीने झाकून द्यावे आणि पाणी देण्यास सुरुवात करावी.
याव्यतिरिक्त fluopiram 400 एस सी 34.48% दोन मिली प्रति झाड याप्रमाणे सूत्र कृमी नाशकाचे ड्रेचींग तयार करता येते.
ते करण्यापूर्वी आदल्या दिवशी झाडांना पुरेशी पाणी द्यावं. दोन मिली रसायन मिसळावं.
हे द्रावण चार ड्रीपर प्रति झाड असल्यास पाचशे मिली प्रति ड्रीपर किंवा दोन ड्रीपर प्रति झाड असल्यास 100 मिलि प्रति ड्रीपर या प्रमाणात द्यावं.
तर शेतकरी बंधुनो अशा पद्धतीने तुम्ही डाळींबातील सूत्र कृमींचे व्यवस्थापन करून डाळिंबाचे उत्पादन वाढवू शकतात.
पुढील लेख पण वाचा बांधकाम कामगार योजना
शेतीविषयी विविध योजना संबंधी माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या