मुलीच्या लग्नासाठी मिळणार ५१ हजार या योजनेबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार इतके अनुदान मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण जाणून घेणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोदणी करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुलीच्या लग्नासाठी मिळणार ५१ हजार सविस्तर माहिती.
सर्वात पहिले या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असावी तरच तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी ५१००० अनुदान देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. online अर्ज कसा करायचा हे आपण बघणार आहोत.
हे अनुदान तुम्हाला शासनाकडून देण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया अर्ज कसा करायचे आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे.
अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे.
विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच marriage certificate.
मुलीचे आधार कार्ड आणि राशन कार्ड.
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला.
वरील ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना लागणार आहे. आता जाणून घ्या अर्ज कसा व कुठे करावा लागणार आहे.
अनुदानासाठी अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे बांधकाम कामगार नोदणी केलेली असवी. जर तुमची बांधकाम कामगार नोदणी झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो हा नंबर तुमच्याकडे असायला हवा.
बांधकाम कामगार या वेबसाईट वर जा. वेबसाईट ओपन झाल्यावर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर टच करा. यानंतर New Claim ला टच करा.
याठिकाणी रजिस्ट्रेशन क्रमांक टाका. जो मोबाईल नंबर तुम्ही नोंदणी करताना दिला आहे त्या नंबर वर एक otp येईल, आलेला otp पुढील चौकटीत टाका.
हे सर्व झाल्यावर एक फॉर्म दिसेल या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती योग्य रित्या भरा.
या पद्धतीने तुम्ही ५१००० हजार अनुदान चा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या मुलीच्या लग्सुनासाठी द्धा ५१००० हजार अनुदान मिळू शकते त्यामुळे आत्ताच या योजनेसाठी अर्ज करा.