श्रावण बाळ योजना सुरु झाली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवट पर्यंत वाचा. या योजनेचा लाभ हा खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.
या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी ४०० कोटी इतका निधी वाटप करण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाचा नवीन जी आर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो.
जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हि माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेतना काही अडचण येणार नाही.
या योजनेचा जीआर सुद्धा आलेला आहे हा जीआर दिनांक २१ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर बघू शकता.
श्रावण बाळ योजना यादी विषयी माहिती
जर तुम्हाला या योजनेची यादी बघायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
वरील लिंक वर टच करा. या लिंक वर टच करून तुम्ही ही यादी बघू शकता.
याच यादी मध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता जसे की कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे आणि कशा प्रकारे मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा 65 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा. जर अर्जदार हा 65 वर्ष वयाचा असले तरच या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळणार आहे.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २१००० किंवा यापेक्षाही कमी असावे तेंव्हाच लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरणार आहे आणि शेवटचे म्हणजे लाभार्थ्याकडे दारिद्रय रेषेखालील कार्ड असावे.
वरीलपैकी जर या सर्व पात्रता लाभार्थ्याकडे असेल तर तो लाभार्थी या योजनेचा लाभ नक्कीच घेवू शकणार आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या योजनेची फाईल तुमच्या तहसील कार्यालयात जमा करून द्या.
तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर ही फाईल जमा करून दिली तेवढ्या लवकर तुमचे काम होईल त्यामुळे लवकर ही फाईल जमा करून द्या. जेणेकरून या योजनेचा जो काही निधी आहे तो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच पुढे पाठवा
श्रावण बाळ योजनेची फाईल pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.