नवीन मतदार नोंदणी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
र या वर्षी तुम्हाला १८ वर्ष पूर्ण झाली असेल तर लगेच मतदार नोंदणी करा. आता तुम्ही हे नोंदणी अगदी तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता. मात्र यासाठी तुमचे वय १८ वर्ष पूर्ण असायला हवे. या मतदार नोंदणीची यादी सुद्धा आलेली आहे.
तुमचे नाव जर या यादी मध्ये असेल तर लगेच तुम्ही मतदार नोंदणी करून घ्या असे आवाहन तुम्हाला शासनाच्या तर्फे देण्यात आलेलं आहे. ही नवीन मतदार यादी कशी कुठे बघायची हे आपण जाणून घेणार आहे. चला तर बघूया या संधर्भात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
नवीन मतदार नोंदणी कशी करायची
chrome किंवा इतर कोणतेही browser ओपन करा.
ओपन केल्या नंतर त्यामध्ये voters.eci.gov.in असे नाव search करा.
पहिल्या लिंक वर टच करून sign up या बटनावर टच करा.
पुढे तुम्हाला तुमचा चालू नंबर टाकायचा आहे आणे email id टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला काही तुमच्या विषयी माहिती विचारल्या जाईल ती माहिती व्यवस्थित रित्या योग्य प्रकारे भरा. आणि शेवटला OTP व्हेरीफाय करून घ्या.
अश्या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन योग्य रित्या झालेले आहे. आता तुम्ही login करू शकता. login झाली नंतर तुम्हाला या ठिकाणी एक पर्याय दिसेल New registration for general electors यावर टच करा. त्या नंतर तुमची भाषा निवडा.
आता राज्य आणि जिल्हा निवडा.
विधानसभा निवडा.
जसेही तुम्ही पुढच्या पेज वर याल तुम्हाला तुमचे नाव हे इंग्रजी मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो ची size 2 MB च्या आत असावी आणि उभी 4.5 व रुंदी 3.5 सेंटीमीटर असावी.
आता पुढे गेल्या नंतर तुम्हाला जी माहिती विचारण्यात येईल ती माहिती योग्य रित्या भरा आणि otp टाका.
आधार क्रमांक टाका. आणि तुमचा संपूर्ण पत्ता टाका.
मतदान कार्ड आणि त्याचे महत्व
जसे प्रत्येक व्यक्ती कडे आधार कार्ड असते तसेच जेव्हा १८ वर्ष पूर्ण होतात तेव्हा मतदान कार्ड काढणे हे आवश्यक असते.
मतदान कार्ड वरून नागरिकाची ओळख होते ज्यामुळे जर काही शासकीय काम असेल तर त्या कामामध्ये त्या व्यक्तीला अडचण येत नाही.
हे सर्व या मतदान कार्ड चे फायदे आहे. चला तर आत जाणून घेयुया हे मतदान कार्ड कसे काढायचे आणे या यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे बघायचे.