जाणून घेवूयात मिनी ट्रॅक्टरसंदर्भातील सविस्तर माहिती mini tractor yojana. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत वाढला असल्याने अनेकजण ट्रॅक्टरद्वारे शेती करत आहेत.
यामुळे आजच्या लेखामध्ये आपण मिनी ट्रॅक्टर योजना mini tractor yojana संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
समाज कल्याण विभागामार्फत हि योजना राबविली जाते. मिनी ट्रॅक्टरसाठी 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान मिळते.
मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 3,15,000 रुपयांचे अनुदान मिळते व 35000 रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून भरावे लागतात.
मिनी ट्रॅक्टर योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
पुढील माहिती पण वाचा 1 फेब्रुवारी पासून मिळणार मोफत साडी
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी मिळते ९० टक्के अनुदान mini tractor yojana
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते उर्वरित १० टक्के निधी लाभार्थ्यांना भरावा लागतो.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
जे अर्जदार नवबौद्ध आहेत किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत त्यांनाच या मिनी मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो.
तुम्हाला जर मिनी मिनी ट्रॅक्टर योजना mini tractor yojana अंतर्गत शासकीय अनुदान हवे असेल तर त्यासाठी तुमचा बचत गट स्थापन झालेला असणे गरजेचे आहे.
जो बचत गट निर्माण केला जाईल त्या बचत गटामधील कमीतकमी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असायला हवेत.
मिनी ट्रॅक्टर योजना mini tractor yojana अंतर्गत शासकीय अनुदान म्हणून 350000 अनुदान मिळते. हे अनुदान मिळविण्यासाठी स्व हिस्सा म्हणून 35 हजार रुपये लाभार्थ्याला भरावे लागतात.
बचत गटांचे जे अध्यक्ष सचिव असेल त्यांच्या नावे हे अनुदान बँकेत जमा होते.
9 hp ते 18 hp अश्वशक्तीचे मिळते मिनी ट्रॅक्टर
मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 9 hp ते 18 hp अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90% अनुदानावर वाटप करण्याची हि योजना आहे.
समाज कल्याण विभागाकडे हा अर्ज सादर करावा लागतो अर्जाचा नमुना आणि इतर माहिती देखील तुम्हाला समाज कल्याण विभागातच मिळू शकते.
मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देवू शकता वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडीओ बघू शकता