उत्तम शेती तेंव्हाच होते जेंव्हा तुमच्या शेतातील पिकांना मुबलक पाणी मिळते. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे अशावेळी तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये हायड्रोजेल Hydrogel चा उपयोग केला तर नक्कीच पाण्याची कमतरता काही प्रमाणात भरून निघू शकते.
या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे ओ देखील नक्की पहा जेणे करून हे हायड्रोजेल कसे वापरावे या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मळेल.
या लेखामध्ये हायड्रोजेल Hydrogel संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
तुम्हाला जर हे विकत घ्यायचे असेल तर खालील अर्ज भरून द्या.
हायड्रोजेल Hydrogel चा उपयोग केला म्हणजे पिकांना पाण्याची अजिबात गरज नाही असा याचा अर्थ नाही तर पावसाळ्यामध्ये जेंव्हा पावसाचा खंड पडतो अशावेळी पिकांना पुढील पाऊस येईपर्यंत तग धरता येवू शकते.
शेतीमध्ये जर हायड्रोजेल Hydrogel चा उपयोग केल्यास जमिनीमध्ये ओलसरपणा टिकून राहतो. पेरणी केली पिक उगवले आणि त्यानंतर पावसाचा खंड पडला तर अशावेळी हे हायड्रोजेल Hydrogel जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवते.
शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू 90 टक्के अनुदान मिळणार shilai mashin application 2024
शेतीसाठी पाणी महत्वाचे.
कितीही खडकाळ जमीन असेल आणि तुमच्याकडे पाणी असेल तर अगदी खडकाळ जमिनीवर देखील चांगल्या प्रकारे पिक घेता येते. परंतु तुमच्याकडे पाणी उपलब्ध नसेल तर मात्र हाताशी आलेले पिक वाया जाण्याची शक्यता असते.
शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिकता येत आहे. शेतीमध्ये हायड्रोजेल Hydrogel चा उपयोग हा देखील त्याचाच एक भाग आहे.
शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये विहीर बोअर घेतलेले आहे. परंतु पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने विहिरींना किंवा बोअरवेलला पाहिजे तसे पाणी लागत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही.
शेतीमध्ये हायड्रोजेल Hydrogel चा उपयोग?
Hydrogel चा उपयोग हा देखील शेतातील एक महत्वाचा बदल आहे. कोरडवाहू जमीन असेल तर बऱ्याच वेळा एकदा पिकला पाणी दिले कि लगेच ३ ते ४ दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागते. अशा ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजेलचा उपयोग केला तर नक्कीच तुमच्या पिकला कमी पाणी लागण्याची शक्यता असते.
कमी म्हणजे किती तर उदारणार्थ तुमच्या माळरान शेतामध्ये पिकांना ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे लागत असेल तर हायड्रोजेल वापरल्याने तुम्ही ५ ते ६ दिवसानंतर पाणी देवू शकता अर्थात हा फक्त अंदाज आहे. परंतु पिकांना पाणी देण्याच्या प्रक्रियेत हायड्रोजेल हा घटक खूप महत्वाचा आहे हे मात्र नक्की.
अधिक माहितीसाठी हायड्रोजेलचा खालील व्हिडीओ पहा.
शेतातील पाणी शोषून ठेवण्याची क्षमता हायड्रोजेलमध्ये असते. याचा उपयोग शेतामध्ये केल्यास जेंव्हा पाण्याची कमतरता असेल त्यावेळी याचा उपयोग होतो.
सर्वसाधारणपणे एकरी ३ किलो प्रमाणे याचा उपयोग केला जातो. 1 किलोमध्ये 10 किलो माती मिसळून शेतात व्यवस्थित फेकून द्यावे.