शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ. या योजने अंतर्गत मिळणार आहे अनुदान. हे अनुदान कसे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
कांदा चाळ अनुदान योजना ही कशी आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कसा करावा लागणार आहे आणि यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे कोणते आहे ही माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
अजूनही बरेच शेतकरी अशे आहे ज्यांच्याकडे कांदा साठवण्यासाठी कांदा चाळ नाही त्यामुळे त्यांच्या मालाचे नुकसान होते. कांदा चाळ अनुदान योजने अंतर्गत मिळालेल्या लाभानंतर लाभार्थ्याची ही समस्या आता राहणार नाही
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला online अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता.
या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्याला अनुदान देण्यात येते. हे अनुदान घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करणे अवश्यक आहे.
कांदा चाळ अनुदान योजना किती मिळेल अनुदान.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला आर्थिक मदत म्हणून अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान ५ मेट्रिक टन पासून 25 मेट्रिक टन नुसार देण्यात येणार आहे आणि एक मेट्रिक टन ३५०० रुपये यानुसार देण्यात येणार आहे.
अशाप्रकारे तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजनाचा लाभ मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्याचा उत्पन्न दाखला.
बँक पासबुकचे झेरॉक्स.
लाभार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र.
सातबारा.
लाभार्थ्याचे आधार झेरॉक्स.
अर्ज कसा करायचा.
जर तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज अकरावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थी online पद्धतीने सुद्धा करू शकतो.
online पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगीन असे सर्च करायचे आहे. आता तुम्हाला तुमचा password टाकून किंवा OTP च्या सहाय्यने लॉगीन करायचे आहे.
लॉगीन झाल्यावर तुम्हाला अर्ज करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला याठिकाणी ४ पर्याय दिसेल त्यापैकी फलोत्पादन च्या समोरील बाबी निवडा या पिवळ्या बटनावर टच करा.
यापुढे तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की तुमचा तालुका, गाव आणि इतर काही माहिती तुम्हाला याठिकाणी योग्य रीत्या भरायची आहे.
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जतन करा या बटनावर टच करायचे आहे.
परत तुम्हाला मुख्यपृष्ठावर यायचे आहे आणि अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर टच कराचे आहे.
आता तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज कलेला आहे ती योजना निवडा आणि अर्ज सादर करा या बटनावर टच करा.
जो अर्ज लाभार्थ्याने सादर केला आहे त्या अर्जाची payment म्हणून २३.६० रुपये भरावे लागणार आहे त्यासाठी make payment या बटनावर टच करा.
याठिकाणी तुम्हाला payment करण्यासाठी अनेक पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला जो पर्याय सोपा आणि योग्य वाटेल त्यानुसार तुम्हाला payment करायचे आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
अशा पद्धतीने तुमचा अर्ज हा सादर झालेला आहे .