नवीन योजना सुरु झालेली आहे या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना असे आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
ग्रामीण भागाकडे स्वयंपाक करण्यासाठी अजूनही बऱ्याच महिला चूल वापरतात. चूल वापरण्यासाठी महिलांना लाकडे किंवा इतर ज्वलनशील पदार्थांचा वापरत करतात. यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांना आणि वातावरणाला सुद्धा हानी होते.
ही समस्या लक्षात घेऊन शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरु केलेली आहे. ही योजना २०१६ मध्ये १ मे ला सुरु करण्यात आली होती. २०१६ पासून २०१९ पर्यंत या योजने अंतर्गत ८ कोटी LPG वाटप करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत लाभार्थ्यांना तीन वर्ष मोफत LPG देण्यात येणार आहे ज्यामध्ये ७५ लाख LPG हे महिला वर्गास मोफत देण्यात येणार आहे.
तसेच ही योजना २०२४ मध्ये सुद्धा सुरु असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे ही माहिती आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना असा करायचा अर्ज
ही योजना प्रधानमंत्री यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती. या योजने अंतर्गत महिलांना मोफत LPG देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://www.pmuy.gov.in/ या वेबसाई वर जायचे आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला थोडे खाली जायचे आहे खाली आल्यानंतर तुमाला या ठिकाणी Eligibility Criteria या बटनावर टच करा. टच केल्यानंतर तुम्हाला दिसेल की योजेसाठी कोण अर्ज करू शकते.
खाली तुम्हाला आवश्यक कागदपत्रे (required documents) सुद्धा मिळेल ते कोणते आहे तुम्हाला या बटनावर क्लिक केल्यावर दिसेल.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला एक LPG चे चित्र दिसेल त्याखाली तुम्हाला Apply for PMUY Connection या बटनावर टच करा.
या ठिकाणी तुम्हाला तीन Connection मधून एका Connection साठी अर्ज करता येणार आहे. तुम्हाला ज्या Connection साठी अर्ज करायचा आहे त्यासमोर click here to apply यावर टच करा.
यानंतर तुम्हाला Connection type मध्ये उज्ज्वला या पर्यावार टच करा. आता तुम्हाला tearm and condition accept करायच्या आहे.
त्याखाली आता तुम्हाला distributer शोधायचा आहे.
याखालील चौकटीमध्ये तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून कॅपच्या भरायचा आहे आणि Generate otp या बटनावर टच करायचे आहे.
आलेला otp हा खालच्या चौकटीमध्ये टाका.
यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे बाकीची माहिती आपोआप येणार आहे. त्यानंतर तुम्हाला cast निवडायची आहे.
लाभार्थ्याच्या रेशन कार्ड संधर्भात तुम्हाला माहिती भाराची आहे.
आता लाभार्थ्या बद्दल काही माहिती विचारण्यात येईल ती माहित योग्य रित्या भरा.
खाली तुम्हला रेशन कार्ड उपलोड करायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याच्या कुटुंबाची माहिती याठिकाणी भरायची आहे.
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या बटनावर टच करायचे आहे.
अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर गरजू नागरिकांपर्यंत ही माहित पाठवा.