शेतकरी बांधवांसाठी ही चांगली बातमी आहे कारण आता मिळणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत ५५ टक्के अनुदानावर सिंचन. ही योजना कशी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा लागणार आहे ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यामागचा उद्देश म्हणजेच शेतकरी वर्गाचा विकास करणे असे आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी राहत नाही किंवा एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो आणि विहिरीत पाही कमी असल्या कारणाने बरेच पीक वाया जाते.
यामुळे बरेच नुकसान होते पण जर शेतकऱ्याकडे जर पाणी देण्याचे योग्य साधन म्हणजेच सिंचन असेल तर पाणीही कमी लागते आणि पीक सुद्धा वाया जात नाही.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना सिंचनसाठी अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान हे ५५ टक्के इतके असणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे.
लाभार्थ्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती.
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा असावा.
सातबारा आणि ८अ हे आवश्यक आहे.
लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे आहे याचे प्रमाणपत्र म्हणजेच cast certificate.
या योजेनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी लाभार्थ्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
एका परिवारातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना लाभ घेण्यासाठी महत्वाची कागदपत्रे
लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र.
चालू मोबाईल क्रमांक व इमेल आयडी.
बँक माहिती व जमिनीचा सातबारा आणि ८अ.
लाभार्थ्याने वापरलेल्या विजेचे बिल( तीन महिन्याचे आवश्यक)
सिंचन खरेदी केले आहे म्हणून त्याचे बिल.
लाभार्थ्याचे पासपोर्ट फोटो.
कृषी विभागाचे पूर्वसंमती पत्र.
वरील हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईटवर जायचे आहे.
या वेबसाईट वर अर्जदाराला login करायचे आहे. यानंतर तुम्हाला अर्ज करा असे निळे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
या ठीकानी तुम्हाला बरेच पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला सिंचन साधने या पर्याय पुढील बाबी निवडा. याठिकाणी तुम्ही हा अर्ज सदर करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.