मिळणार आहे मोफत वीज प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत. ही नवीन योजना सुरु झाली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्याला घरावर सोलर प्लेट्स लावण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
अनुदान कसे मिळणार आहे आणि किती मिळणार व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा ही संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ही योजना राबविण्यामागचे कारण म्हणजे सर्वाना विजेचा फायदा देणे आहे. आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणावर हे शेतकरीचा असतात त्यामुळे या योजने अंतर्गत लाभार्थ्याला मोफत वीज मिळणार आहे.
जर वीज वापरायची म्हणल तर बिल सुद्धा येते आणि ग्रामीण भागामध्ये वीज ही कधी राहते तर कधी राहत नाही त्यामुळे गावाकडील नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. या योजनेचा लाभ 1 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे.
ही समस्या लक्षात घेऊन शासनातर्फे प्रधानमंत्री सूर्य घर योजना राबविण्यात येत आहे. या योजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ही माहिती बघूया.
कागदपत्रे
लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि शिधापत्रिका.
पासबुक.
चालू मोबाईल क्रमांक.
लाभार्थ्याच्या पत्याचा पुरावा.
६ महिन्याचे वीज बिल.
प्रधानमंत्री सूर्य घर योजना असा घ्या लाभ
अर्ज करण्यासाठी तुम्हला https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाईवर यायचे आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला याठिकाणी डाव्या बाजूला तीन पर्याय दिसेल 1. Apply For Rooftop Solar 2. Subsidy Structure. 3. Empanelled Vendors.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिल्या Apply For Rooftop Solar या पर्यायवर टच करायचे आहे. याठिकाणी तुम्हला परत दोन पर्याय दिसेल 1. Register Here. 2. Login Here.
जर तुम्ही याठिकाणी पहिल्या वेळेस असाल तर तुम्हाल Register Here या पर्यायावर टच करायचे आहे. Registerकरण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. या ठिकाणी Register करताना लाभार्थ्याला काही माहिती भाराची आहे.
Register झाल्यानंतर तुम्हाला लॉगीन करायचे आहे. यानंतर तुम्हाला Apply For Rooftop Solar अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल त्याखाली तुम्हाला proceed असे बटन दिसेल त्यावर टच करा.
proceed केल्यानंतर तुमच्यासमोर आता फॉर्म आलेला आहे. याठिकाणी लाभार्थ्याबद्दल माहिती भरायची आहे.
माहिती भरल्यानंत पुढच्या पेजवर तुम्हाला calculator दिसेल यामध्ये तुम्ही सबसिडी व इतर बऱ्याच गोष्टी calculator करू शकता (हे आवश्यक नाही).
तुम्हाला किती kilowatt ची आवश्यकता असणार आहे ते या उजव्या बाजूच्या रकान्यामध्ये टाका. तुम्हाल ज्या ठिकाणी या योजनेचा लाभ घायचा आहे त्याठीकांचे location निवडा.
शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हला एक ६ महिने जुने वीज बिल उपलोड करायचे आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर final submission या बटनावर टच करायचे आहे. जर काही माहिती चुकली असेल तर खाली तुम्हाला एडीट सुद्धा करू शकता.
आता तुम्हला याठिकाणी लाभार्थ्याच्या बँक details भरायच्या आहे आणी submit करायचे आहे.
अशा प्रकरे तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज करू शकता.