प्रधानमंत्री कौशल विकास योजना

२०१५ साली ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना आमलात आली होती. ही योजना राबविण्यामागचा उद्देश म्हणजे तरुण वर्गाचा विकास. जे बेरोजगार तरुण आहे त्यांना या योजने अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे ज्यामध्ये त्यांना विविध कौशल्य ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

बेरोजगार तरुण जे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. यामध्ये तुम्हाला रोजगार मिळेल अशा कामांची ट्रेनिंग देण्यात येणार आहे ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कशा प्रकारे आहे आणि यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी कशी करायची आणि कोठे करायची ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत असा घ्या लाभ

या अंतर्गत लाभार्थ्याला उत्तम पद्धतीचे कौशल देण्यात येणार आहे. जर लाभार्थ्याला या कौशल्याचा आधारावर रोजगार हवा असेल तर याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर लाभार्थ्याला पात्र ठिकाणी रोजगार मिळू शकतो.

लाभार्थी जसेही या योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करेल त्या वेळेस लाभार्थ्याला प्रमाणपत्रासह ८ हजार रुपये मिळणार आहे.

ही ट्रेनिंग लाभार्थ्याला ज्याही क्षेत्रात दिली जाणार आहे ती अतिशय चांगल्या दर्ज्याची असणार आहे. यामध्ये लाभार्थ्याला काही नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.

हे प्रशिक्षण घेतल्या नंतर लाभार्थ्याला डिजिटल इंडिया प्रकल्प, मेकइन इंडिया व इतर बऱ्याच योजने अंतर्गत रोजगार म्हणजेच नोकरी मिळू शकते यासाठी लाभार्थ्याला परिक्षा द्यावी लागणार आहे.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाईन नोंदणी

या योजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला  https://www.pmkvyofficial.org/ या वेबसाईट वर जायचे आहे.

याठिकाणी तुम्हाला ही नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करणे हे अतिशय सोपे आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा नोंदणी करू शकता.

ही नोंदणी करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा

नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्याला वाहन चालक परवाना, मतदान कार्ड आणि आधार कार्ड हे लागणार आहे.  हे प्रशिक्षणासाठी काही सुद्धा ठेवण्यात आलेला आहे जसे कि ३ महिने किंवा ६ महिने.

लाभार्थी अर्ज करताना त्याच्या आवडत्या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊ शकतो.

९० टक्के अनुदानावर मिळणार आहे शिलाई मशीन

instagram

Leave a Comment