ही महाराष्ट्र कन्यादान योजना महाराष्ट्र राज्यात राबविली जात आहे. या योजने अंतर्गत मुलीच्या कन्यादानासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान किती मिळणार आहे व यासाठी काय करावे लागणार आहे कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुलीच्या लग्नासाठी पात्र लाभार्थ्याला या योजने अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. महाराष्ट्र कन्यादान योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र तर्फे राबविण्यात येत आहे.
ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजेच अनुसूचित जाती जमातीमधील लाभार्थ्यांना आर्थिक आणि सामाजिक मदत करणे आहे ज्यामुळे हा समाज सुद्धा चांगली प्रगती करेल.
महाराष्ट्र कन्यादान योजना अंतर्गत किती मिळेल आर्थिक सहाय्य
हे आर्थिक सहाय्य लग्न करणाऱ्या पती पत्नीला आणि ज्या ठिकाणी हे लग्न होणार आहे त्या संस्थेला सुद्धा काही ठराविक रक्कम मिळणर आहे. ही रक्कम किती मिळणार आहे बघा खालीलप्रमाणे.
पती आणि पत्नीला या योजने अंतर्गत एकूण १० हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे आणि ज्या ठिकाणी लग्न होणार आहे म्हणजेच या लग्नाची संपूर्ण तयारी करणाऱ्या संस्थेला एका लाग्नामागे एकूण २ हजार रुपये देण्यात येणार आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी काही अटी सुद्धा आहे. या अटी कोणत्या आहे बघा माहिती खालीलप्रमाणे.
कोणत्या आहे अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवे.
जे लाभार्थी लग्न करणार आहे त्यांचे वय सुद्धा ठरवून दिलेले आहे जसे कि लग्न करणाऱ्या मुलाचे वय हे २१ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे आणि मुलीचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्ष्या जास्त असायला हवे.
लाभार्थ्याचा प्रवर्ग हा अनुसूचित जाती जमातीचा हवा.
या योजनेचा लाभ लाभार्थी फक्त पहिल्या लग्नासाठी घेऊ शकतात.
दोन्ही लाभार्थ्यांच्या परिवारातील कोणताही व्यक्ती सरकारी जॉब ला नसावा.
महाराष्ट्र कन्यादान योजना आवश्यक कागदपत्रे
दोन्ही लाभार्थ्यांचे ओळखपत्रे.
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे त्याचे प्रमाणपत्र.
बँक पासबुक झेरॉक्स.
लाभार्थ्याचा उत्पन्न दाखला.
लाभार्थी दारिद्र्य रेषेचा लाभार्थी आहे याचे प्रमाणपत्र.
विवाह झाला आहे याचा पुरावा म्हणून नोंदणी.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणच्या सहाय्य आयुक्ताकडे लाभार्थी प्रस्ताव सदर करावा लागणार आहे. तेव्हाच या योजनेचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.
जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर पुढे नक्की पाठवा.