ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव महाराष्ट्र सैर कृषी वाहिनी योजना असे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना कमीतकमी दरात वीज उपलब्ध करून देणे आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.अर्ज कसा करायचा, कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना वीज बिल भरायचे काम नाही.या योजने हे बरेच फायदे आहे जसे की शेतकऱ्यांसाठी पाहिजे तेव्हा वीज उपलब्ध राहणार आहे.
महाराष्ट्र सैर कृषी वाहिनी योजना स्वरूप
राज्यातील शेतकरी हा वीज बिल मुक्त झाला पाहिजे म्हणून यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच सौर ऊर्जा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा घेता येणार आहे.
या योजनेमध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ९५ टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे.
या योजने हे भरपूर फायदे आहे हे आपण वरीलप्रमाणे बघितले आहे तसेच यासोबत ५ वर्षाची गॅरंटी दिली जाणार आहे.
जर अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील असेल तर यासाठी अर्जदाराला किती रक्कम भरावी लागणार आहे आणि जर अर्जदार अनुसूचित जाती आणि जमातीला असेल तर त्याला किती रक्कम भरावी लागणार आहे बघा खालीलप्रमाणे.
महाराष्ट्र सैर कृषी वाहिनी योजना लाभ घेण्यासाठी किती भरावा लागणार निधी
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्याला लाभ घेण्यासाठी काही निधी भरावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत ३ hp, ५ hp आणि ७.५hp च्या कृषी पंपासाठी अर्ज करता येणार आहे.
३hp चा पंपासाठी लाभार्थ्याला १६,५६० रुपये भरावे लागणार आहे.
५ hp च्या पंपासाठी लाभार्थ्याला २४,७१० रुपये भरायचे आहे आणि ७.५ hp च्या पंपासाठी लाभार्थ्याला ३३,४५५ रुपये भरावे लागणार आहे.
वरील रक्कम ही फक्त १० टक्के इतकी आहे. ही रक्कम खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती रक्कम भरावी लागणार आहे बघा खालीलप्रमाणे.
३ hp च्या सौर पंपासाठी लाभार्थ्याला ८,२८० रुपये भरावे लागणार आहे.
५ hp च्या पंपासाठी लाभार्थ्याला १२,३५५ रुपये भरावे लागणार आहे आणि ७.५ hp च्या पंपासाठी लाभार्थ्याला एकूण १६,७२८ रुपये रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम फक्त ५ टक्के आहे.
कोणते लाभार्थी आहे पात्र
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
जो लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्या नावावर विजेचे कनेक्शन नसावे.
लाभार्थ्याकडे स्वतःची विहीर असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी किती शेती असणे आवश्यक आहे.
जर लाभार्थ्याकडे २.५ एकर जमीन असेल तर ३ hp चा पंप लाभार्थ्याला मिळणार आहे.
अर्जदाराकडे जर ५ एकर किंवा यापेक्षा जास्त जमीन असेल तर ७.५ hp पर्यंत अर्जदार अर्ज करू शकतो.
कागदपत्रे
अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा.
सातबारा आणि आठ अ.
बँक खाते पासबुक.
ओळखपत्र.
चालू मोबाईल क्रमांक.
पासपोर्ट साईज चे फोटो.
पॅन कार्ड.
ईमेल आयडी.
ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती जागा त्याचा पुरावा.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जा
आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिसतील.त्यापैकी पहिला पर्याय म्हणजेच अर्ज करा यावर क्लिक करा.
लाभार्थ्याला किती एचपीच्या पंपासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
आता या ठिकाणी लाभार्थ्याला काही माहिती विचारण्यात येणार आहे ती माहिती योग्यरीत्या भरा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.