वाळू मिळणार फक्त ६०० रुपये प्रती ब्रास

आता वाळू मिळणार फक्त ६०० रुपये प्रती ब्रास बघा संपूर्ण माहिती.

घराचे बांधकाम करायचे असेल किंवा इतर कोणतेही बांधकाम करायचे असेल तर यासाठी आवश्यक लागणारी वस्तू म्हणजे वाळू आहे. बाळू ही बांधकाम करण्यासाठी अतिशय महत्वाची असते. ग्रामीण भागाकडे वाळूचे दर हे खूप जास्त प्रमाणात आहे.

साधारणपणे ग्रामीण भागाकडे वाळूचे दर हे अंदाजे ४ हजार ते ६ रुपये आहे. पण आता चिंता करण्याची काही गरज नाही. वाळू मिळणार फक्त ६०० रुपये प्रती ब्रास. ही माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे आणि यासाठी अर्ज सुद्धा सुरु झालेले आहे.

जर तुम्हाला ६०० प्रती ब्रास वाळू हवी असेल तर यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि कसा करायचा ही संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

वाळू मिळणार फक्त ६०० रुपये प्रती ब्रास असा करा अर्ज

ज्या लाभार्थ्याला ही स्वस्त वाळू हवी असेल त्याला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणारा आहे. बघा अर्ज कसा सादर करायचा.

हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला महाखानीज या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला ही सर्व प्रक्रिया कशी आहे याचे एक चित्र दिसेल. जसे की वाळू बुकिंग करण्याची पद्धत कशी आहे.

आता तुम्हाला याठिकाण वर पिवळ्या रंगाच्या लॉगीन करा या बटनावर टच करायचे आहे. याठिकाणी जर तुम्ही पहिले पण आलेले असाल तर तुमचे अकाऊंट पहिलेच असेल. तुम्ही याठिकाणी नवीन अकाऊंट सुद्धा तयार करू शकता.

लॉगीन झाल्यानंतर परत तुमच्या समोर एक नवीन पेज तयार होईल. यामध्ये तुम्हाला भरपूर पर्याय दिसले त्यापैकी तुम्हाला पहिल्या म्हणजेच Register Project यावर टच करायचे आहे.

याठिकाणी तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये म्हणजेच project type मध्ये काही माहिती भरायची आहे. जसे कि जर तुम्ही वाळू कोणत्या कामासाठी घेत आहे.

यापुढे लाभार्थ्याला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.

त्याखाली तुमच्या प्रकल्पाचे नाव काय आहे ते टाका.

लाभार्थी कोणत्या बांधकामासाठी या वाळूचा उपयोग करणार आहे ते निवडा.

लाभार्थ्याला किती ब्रास वाळू हवी आहे ते टाका.

यानंतर ज्या ठिकाणी ही वाळू हवी आहे त्या ठिकाणचा पत्ता टाका.

ज्या जागेवर बांधकाम चालू आहे त्या जागेचा गट नंबर टाका.

आता खाली काही कागदपत्रे उपलोड करायची आहे. जसे की आधार कार्ड.

हा तर झाला प्रकल्प अहवाल, आता बघा कशी करायची वाळू बुकिंग.

अशी करा वाळू बुकिंग

डाव्या बाजूच्या निळ्या पट्टीवर क्लिक करा.

book sand या तीन नंबरच्या पर्यायावर टच करा.

आत्ता जो प्रकल्प बनवला आहे तो निवडा.

त्यापुढे तुम्हाला किती ब्रास वाळू हवी आहे ते टाका.

आता तुम्हाला जवळच्या वाळू डेपोचे अंतर टाकायचे आहे आणि शोधायचे आहे. जोपर्यंत डेपो सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला अंतर टाकायचे आहे शोधत राहायचे आहे.

डेपो निवडल्यावर तुम्हाला याठिकाणी किती वाळू आहे ते टाका.

यानंतर तुम्हाला total किती खर्च येणार आहे ते दाखवेल.

confirm या बटनावर टच करा.

याठिकाणी आता तुम्हाला payment कराची आहे.

payment केल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती डाउनलोड करा.

तुम्ही बुकिंग ची स्थिती सुद्धा पाहू शकता.

स्थिती बघण्यासाठी तुम्हाला परत डाव्या बाजूच्या निळ्या पट्टीवर टच करायचे आहे.

याठिकाणी तुम्हाला my bookings असा पर्याय दिसेल तयार टच करा.

अशा पद्धतीने तुम्ही ही वाळू ऑनलाईन बूक करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी करा एका रुपयात

Leave a Comment