राज्यातील मुलींना मिळणार मोफत शिक्षण. कोणत्या मुली यासाठी पात्र आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
हे मोफत शिक्षण महाराष्ट्र राज्यातील मुलींना देण्यात येणार आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण या विभागातर्फे राबविली जात आहे. ही योजना राबविण्यामागचा उद्देश म्हणजेच राज्यातील मुलींची शैक्षणिक प्रगती वाढवणे आहे. शिक्षण घेण्यापासून कोणतीही मुलगी वंचित राहायला नको.
ग्रामीण भागाकडे कुटुंबे हे आर्थिक दृष्टीने सक्षम राहत नाही. या कारणामुळे बऱ्याच मुलींचे शिक्षण थांबवून त्यांचे लग्न करण्यात येते किंवा त्यांना घरकामे करावी लागतात.
ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या लाभार्थी मुली पात्र ठरणार आहे आणि कोणते कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. माहिती बघा खालीलप्रमाणे.
मुलींना मिळणार मोफत शिक्षण कोणत्या लाभार्थी मुली आहे पात्र
या योजने अंतर्गत पात्र मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे ज्यामध्ये एकूण ८०० कोर्से आहे. या ८०० कोर्स मधून पात्र मुलगी जो कोर्स निवडेल त्यासाठी एक रुपया सुद्धा फी भरण्याची गरज नाही. शिक्षण घेण्यासाठी पात्र लाभार्थी मुलींना कुठल्याही प्रकारची फी भरायची गरज नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलगी ही महाराष्ट्र राज्यची रहिवासी असावी. तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे एका वर्षाचे उत्पन्न ८ लाख किंवा यपेक्षा कमी असावे.
ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली आह त्यामुळे लाभार्थी ही महाराष्ट्र राज्यची असावी.
महत्वाची कागदपत्रे
हा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे. बघा खालीलप्रमाणे.
मुलीचे आधार कार्ड.
उच्च शिक्षण घेण्यासाठी शाळा सोडली आहे याचा दाखला.
गुणवत्ता प्रमाणपत्र.
ओळखपत्र.
वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
छायाचित्र.
वरील ही सर्व कागदपत्रे लागणार आहे.
हा लाभ उच्च शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये ८०० कोर्से पैकी कोणत्याही एका कोर्से साठी मुलीला मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
अधिक माहिती
अशाच प्रकारच्या नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.