बांधकाम कामगारांना मिळणार ५००० रूपये बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
ज्या लाभार्थ्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून सक्रिय आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या कामासाठी हत्यारे खरेदी करण्यासाठी रुपये ५ हजार इतके आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर अर्ध डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी हा अर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत अर्जदाराला ५ हजाराचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून सक्रिय असायला पाहिजे.
जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी झालेली नसेल ही नोंदणी करणे अतिशय सोपी आहे. बांधकाम कामगार नोंदणी संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगारांना मिळणार ५००० रूपये बघा कोण आहे पात्र
बांधकाम कामगार नोंदणीकृत लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहे बघा खालीलप्रमाणे.
ज्या लाभार्थ्यांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ६० वर्षापेक्षा कमी आहे ते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे.
लाभार्थ्याकडे 90 दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याची नोंदणी ही सक्रिय असणे आवश्यक आहे.लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
लाभार्थी १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा
वरील या सर्व पात्रता लाभार्थ्यांमध्ये असावे.
बांधकाम कामगारांना मिळणार ५००० रूपये लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ज्या लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल त्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
बँक पासबुक.
रहिवासी प्रमाणपत्र.
लाभार्थ्यांनी 90 दिवस काम केलेले आहे याचे प्रमाणपत्र.
लाभार्थी बांधकाम कामगार आहे याचे प्रमाणपत्र (ग्रामपंचायत कडून).
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक.
लाभार्थ्याचा ईमेल आयडी.
जन्म प्रमाणपत्र.लाभार्थ्याचे छायाचित्रे.लाभार्थीच्या पत्त्यावर राहतो याचा पुरावा.
ज्या ठिकाणी लाभार्थी काम करतो त्या ठिकाणचा पत्ता.
वरील हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
असा करा अर्ज
या लाभार्थ्याला या योजनेसाठी करायचे आहे त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल आहे.
या योजनेसाठी सध्या तरी कुठलेही प्रकारचे ऑनलाइन अर्ज सुरू करण्यात आलेले नाही.
हा अर्ज तुम्हाला तुमचे जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार कार्यालयामध्ये सादर करावा लागणार आहे.
जर तुम्हाला या योजनेचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर खालील बटणावर क्लिक करा.
या अर्जामध्ये लाभार्थ्याला काही माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती भरण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.
अर्ज करताना ही माहिती भरा
हा अर्ज तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा अर्ज भरायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे ही माहिती अशा प्रकारे आहे.
यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले नोंदणी दिनांक टाकायचा आहे.
यानंतर रिन्यूअल दिनांक टाकायचा आहे.
यापुढे आवक दिनांक टाकायचा आहे.
या खालील चौकटीत नोंदणी क्रमांक टाका आणि आधार क्रमांक टाका.
आता याखाली तुम्हाला अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
यामधे अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे.
या खालच्या चौकटीमध्ये मोबाईल क्रमांक लिंग आणि विवाह स्थिती अर्जदार विवाहित आहे की नाही ही माहिती भरायची आहे.
त्याखाली जन्म तारीख आणि अर्जदार किती वर्षाचा आहे ही माहिती भरा.
याखाली अर्जदाराच्या बँकेची माहिती भरायची आहे IFSC कोड, अर्जदाराच्या बँकेचे नाव आणि शाखा.
बँक खाते क्रमांक.
शेवटचे म्हणजे हमीपत्र.
वरील ही सर्व माहिती लाभार्थ्याला अर्ज करताना भरावी लागणार आहे.