विद्युत मोटार पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप म्हणजेच विहिरीतील मोटर घेण्यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा.
जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
शेतमधील पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप अतिशय आवश्यक असते. शेतकऱ्यानं हा पंप घेण्यासाठी शेतकऱ्याला बराच खर्च येतो पण आता हा पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
विद्युत मोटार पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड.
सातबारा (विहीर नोंदणी आवश्यक आहे)
लाभार्थी बँक तपशील.
पासबुक झेरॉक्स.
वरील ही सर्व विद्युत मोटार पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज.कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
75 टक्के अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा बघा खालील प्रमाणे.
विद्युत मोटार पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला महा DBT या अधिकृत पोर्टलवर या.
जर तुम्ही याठिकाणी पहिल्यांदा आले असाल तर नवीन अर्जदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.तुमची नोंदणी जर याठिकाणी पहिलेच असेल तर लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला याठिकाणी अर्ज करा असे निळे बटण दिसेल त्यावर टच करा.आता तुमच्या समोर बरेच पर्याय दिसतील त्यापैकी सुंचान साधने व सुविधा यापुढील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
आता याठिकाणी लाभार्थ्याला काही माहिती भरायची आहे जसे की तालुका, गाव, घटक(सिंचन साधने निवडा),बाब मध्ये पंपसेट/इंजन/मोटर हा पर्याय निवडा.घटक मध्ये अर्जदाराला जी इलेक्ट्रिक मोटर लागणार आहे ती निवडा.
याखाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मी पूर्वसंमती शिवाय अर्ज करणार नाही या पर्यायावर टिक करा.याखालीच तुम्हाला एक जतन करा म्हणून एक हिरवे बटन दिसेल त्यावरती टच करा.
घटक यशस्वीरित्या जतन केले आहे आपणास काही घटक निवडायचे आहे का याखाली जर तुमची काही चूक वगैरे झाली असेल तर तुम्ही या ठिकाणाहून सुधारणा करू शकतात.यानंतर yes या पर्यायावर टच करा.
परत मुखपृष्ठावर या आणि अर्ज सादर करा या पर्यावरण क्लिक करा.पहा या बटणावर टच करा.त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही केलेले सर्व अर्ज दिसेल. त्यापैकी लाभ तुम्हाला सर्वात पहिले घ्यायचा आहे त्याला एक असे प्रधान्य द्या.
आता या खाली तुम्हाला अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करायचे आहे.या अर्जाचे शुल्क म्हणून 26 रुपये 60 पैसे द्यावे लागणार आहे हे पैसे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करावे लागणार आहे.
ही पेमेंट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बरेच पर्याय याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
जशी तुम्ही पेमेंट कराल त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे किंवा तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायची आहे.अशा पद्धतीने तुमचा अर्ज सादर झालेला आहे.
अटी आणि शर्ती
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराकडे स्वतःची विहीर किंवा बोरवेल असावा.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा यापेक्षा कमी असावे.
अधिक माहिती
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला 90 ते 95 टक्के अनुदान देण्यात येणार आहे या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळेल.