इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना हे विधवा महिलांसाठी राबविली जाणारी एक योजना आहे. या योजने अंतर्गत विधवा महिलांना शासनाच्या वतीने आर्थीक सहाय्य दिले जाते. या योजने अंतर्गत महिलांना प्रत्तेक महिन्याला पेन्शन देण्यात येते.
या योजने अंतर्गत विधवा महिलांना किती पेन्शन देण्यात येणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि अर्ज करण्यसाठी लागणार महत्वाची कागदपत्रे कोणती आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
कुटुंबातील मुख्य पुरुष जर अचानक सोडून गेला तर त्या घराची संपूर्ण जबाबदारी ही महिलेला घ्यावी लागते. अशा वेळी महिलांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. घर चालवणे मुलांचे शिक्षण करणे आणि इतर बरेच काही. यासाठी आता विधवा महिलांना आर्थिक मदत म्हणून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना सुरु केलेली आहे.
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना स्वरूप
या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रती महिना ६०० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे ज्यामध्ये राज्य शासनाकडून महिन्याला ४०० रुपये आणि केंद्र शासनाकडून महिन्याला २०० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करण्यात योतो. यासाठी एकूण ९० दिवस इतका कालावधी लागतो.
यासाठी 40 ते 65 वर्षाखालील विधवा महिला पात्र ठरणार आहे. आर करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
कागदपत्रे
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
शपथपत्र.
छायाचित्र.
महिलेच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
मोबाईल क्रमांक.
जात प्रमाणपत्र.
विहित नमुना अर्ज.
दारिद्र्य रेषेतील प्रमाणपत्र.
लाभार्थी महिलेचे वय किती आहे याचा पुरावा.
रेशन कार्ड.
बँक पासबुक.
वरील ही सर्व कागदपत्रे अर्ज करतना आवश्यक लागणार आहे.
कसा करायचा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करवा लागणार आहे. हा अर्ज सादर करण्यसाठी लाभार्थी महिलेला जिल्ह्याच्या ठीकाणी तलाठी कार्यालायाध्ये भेट द्यावी लागणार आहे.
विधवा पेन्शन योजना अधिकृत वेबसाईट याठिकाणी तुम्हाला या योजनेची अधिकृत माहिती मिलेले.
अधिक माहिती.
मुलीच्या शिक्षणासाठी लेक कडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख 1 हजार रुपये.
अशाच प्रकारच्या नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.
instagram पेज सुद्धा follow करा.