शेतकऱ्यांना शेततळे खोदकाम करण्यासाठी मागेल त्याला शेततळे अनुदान योजना अंतर्गत आर्थिक मदत म्हणून काही अनुदान देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी शेततळे हे अतिशय महत्त्वाचे असते पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीमध्ये जास्त काळ पाणी थांबत नाही त्यामुळे शेततळे हे एक उत्तम पर्याय म्हणून शेतकऱ्यांसमोर असतो.
शेततळे खोदकाम करण्यामध्ये बराच खर्च येतो पण आता यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान किती देण्यात येणार आहे आणि अनुदान घेण्यासाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत अर्जदाराला 75 हजारापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे बघा खालील प्रमाणे.
शेततळे अनुदान योजना लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे
ही योजना महाराष्ट्र मध्ये संपूर्ण राज्यांमध्ये लागू केलेली आहे त्यामुळे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराकडे 60 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असावी.
ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शेततळे निश्चित केले आहे याच ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे.
अर्ज करताना शेततळ्याचा जो आकार घेतलेला आहे त्याच आकारात लाभार्थ्याला शेततळे देण्यात येणार आहे.
शेततळ्याचे काम हे वेळेचे आत म्हणजेच तीन महिन्याच्या आत पूर्ण झाले पाहिजे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही शेततळे योजनाचा लाभ घेतलेला नसावा.
हा अर्ज लाभार्थ्याला ऑनलाइन प्रकारे करावा लागणार आहे. यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याची रहिवासी प्रमाणपत्र.
रेशन कार्ड कार्ड आणि आधार कार्ड.
शेतकऱ्याचा सातबारा.
जमिनीचा आठ.
कास्ट सर्टिफिकेट.
जर लाभार्थी दारिद्र रेषेखालचा असेल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र लागेल.
अर्जदाराचा ईमेल आयडी.
छायाचित्रे.
वरील ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना लाभार्थ्याला आवश्यक लागणार आहे.
शेततळे अनुदान योजना असा करा अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचे आहे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसेल मागेल त्याला शेततळे त्यावर टच करा.
आता या ठिकाणी अर्जदाराला त्याची काही माहिती भरायची आहे.ही माहिती योग्यरीत्या भरा माहिती भरल्यानंतर खालील सबमिट या पर्यावर क्लिक करा.
अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल हे पावती तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जमा करून ठेवू शकता.
अशाप्रकारे तुमचा अर्ज सादर झालेला आहे.जर तुम्हाला यासाठी शेततळे पन्नी अनुदान सुद्धा हवे असेल तर तुम्हाला ती सुद्धा मिळू शकते.