नमो शेतकरी सन्मान निधी हफ्ता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण रक्कम 2 हजार रुपये इतका हप्ता देण्यात येतो. या योजनेअंतर्गत एकूण दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच एकूण ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेली आहे.
तुम्हाला हा निधी मिळाला का? जर मिळाला नसेल तर तुम्ही याची स्टेटस सुद्धा चेक करू शकता हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता चेक करण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता चेक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता हा हप्ता चेक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे ही संपूर्ण प्रक्रिया या लेखांमध्ये दिलेली आहे.
अशा पद्धतीने करा नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता स्टेटस चेक ऑनलाईन
नमो शेतकरी सन्मान निधी हफ्ता स्टेटस् चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दोन पर्याय दिसतील त्यामध्ये एक आहे लॉगिन आणि दुसरे म्हणजे बेनीफिशियली स्टेटस.
यापैकी आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी आपट्याचे स्टेटस बघायचे आहे त्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
या ठिकाणी आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील जसे की रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी तुम्ही कोणताही एक नंबर टाकून आणि कॅप्चर टाकून तुमची स्टेटस बघू शकता.
मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालील चौकटीमध्ये कॅपच्या भरा आणि त्याखालील बटन गेट डेटा यावर टच करा.
जसे ही तुम्ही या गेट डाटा बटणावर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात येईल.
या पेजला सर्वात खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला फंड डिस्ट्रीब्यूशन डिटेल्स असा एक पर्याय दिसेल.
या पर्यायाखाली तुम्हाला पहिला हप्ता दुसरा हप्ता कधी मिळालेला आहे ही संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.
जर तुम्हाला हा निधी मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही नऊ शेतकरी सन्मान निधी हप्ता ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता.
तुम्ही जर अजून नमो शेतकरी सन्मान निधी यासाठी नोंदणी केली नसेल तर नोंदणी कशी करायची बघा संपूर्ण माहिती.
अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले मिळेल.