ई रिक्षा वाटप सुरू e riksha बघा संपूर्ण माहिती मोबाईलवर.
जर तुम्ही मोफत ई रिक्षासाठी अर्ज केलेला असेल तर आता तुमचे नाव सुद्धा या यादीत असू शकते. ही यादी कशी बघायची आणि कोठे बघायची ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या योजनेसाठी या आगोदर ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले होते, ज्याची शेवटची तारीख 5 जानेवारी होती परंतु पाच जानेवारीपासून वाढवून ही तारीख आठ जानेवारीपर्यंत करण्यात आली होती.
ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीमध्ये मोफत ई रिक्षासाठी अर्ज केला होता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागा अंतर्गत राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील बेरोजगार अपंगांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.
या योजनेअंतर्गत अपंगांना मोफत ई-रिक्षा देण्यात येणार आहे.
ई रिक्षा वाटप सुरू यादी चेक करा मोबाईलवर
ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांची यादी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुम्हालाही यादी बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
यादी बघण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
जसे ही तुम्ही वेबसाईट ओपन करा तुम्हाला खाली तीन पर्याय दिसतील त्यापैकी उजव्या साईड च्या SEE BENEFICIARIES LIST या पर्यायावर टच करा.
आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा विभाग निवडायचा आहे.
विभाग निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
जिल्हा निवडल्यानंतर आता तुम्हाला यापुढे एक व्ह्यू असे बटन दिसेल त्यावरती टच करा.
ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला थोड्यावेळ थांबायचं आहे.
यानंतर तुम्हाला खाली एक यादी दिसेल त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तपासा.
ज्या अपंग लाभार्थ्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचा अर्ज याठिकाणी मंजूर झालेला आहे.या ठिकाणी फक्त जे लाभार्थी 100% अपंग आहे त्यांनाच पहिले प्राधान्य देण्यात आलेले आहे.
याच वेबसाईटवर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा बघू शकता. जे लाभार्थी 40% पासून ते 90 ते 95% पर्यंत अपंग आहे त्यांचा बऱ्याच पैकी अर्ज मंजूर करण्यात आलेला नाही.
ही यादी बघण्यासाठी तुम्हाला काही अडचणी सुद्धा येऊ शकतात वेबसाईट थोडा लोड सुद्धा घेऊ शकते.
जर तुम्ही चेक केल्यानंतरही या ठिकाणी यादी दिसत नसेल तर तुमचे नेटवर्क योग्य असल्याची खात्री करा किंवा थोड्या वेळानंतर पुन्हा यादी तपासून पहा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
नवीन लाभार्थी सुद्धा करू शकते अर्ज
तुम्ही अविन लाभार्थी असाल व याअगोदर अर्ज केला नसेल तर आता परत तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अशी सूचना या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे e riksha.
ज्या नवीन अपंग लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी एक एप्रिल पासून अर्ज सुरू करण्यात येणार आहे.