शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता पात्र शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन मिळणार तसेच यासाठी यासाठी 50 ते 75 टक्के अनुदान सुद्धा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना शेतकामासाठी बैलजोडीची अतिशय आवश्यकता असते बैलजोडी शिवाय शेती होणे ही अशक्य गोष्ट आहे. यांना खुराक देण्यासाठी शेतकऱ्याला तडजोड करावी लागते. बऱ्याच वेळेस या प्राण्यांसमोरचा चारा हा खूप जास्त प्रमाणात वाया जातो.
जर तोच चारा या जनावरांना कुट्टीच्या स्वरूपात दिला तर चारा कमीत कमी वाया जाण्याची शक्यता असते यामुळेच आता पात्र शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन देण्यात येणार आहे आणि या मशीनवर 50 टक्के अनुदान पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याला 10 हजारापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा कुठे करायचा आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
कडबा कुट्टी मशीन लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे अशी आहे बघा खालील प्रमाणे
आधार कार्ड.
सातबारा.
जमिनीचा आठ अ.
बँक पासबुक.
मोबाईल क्रमांक.
उत्पन्न प्रमाणपत्र.
रहिवासी प्रमाणपत्र.
मोबाईल क्रमांक हा आधार कार्ड ला लिंक असावा.
जर ही मशीन खरेदी केली असेल तर याची पावती.
वरील हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
कडबा कुट्टी मशीन असा करा अर्ज
जर तुम्हाला हे मशीन 50 ते 75 टक्के अनुदानावर हवी असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कशा पद्धतीने करायचा बघा खालील प्रमाणे
सर्वात पहिले अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे. अधिकृत वेबसाईट खाली बटनामध्ये दिलेली आहे जर तुम्हाला त्या वेबसाईटवर डायरेक्ट जायचे असेल तर बटनावरती क्लिक करा.
जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्हाला तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे.
नोंदणी झाल्यावर जसे ही तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन कराल तसे तुम्हाला या ठिकाणी एक अर्ज करा असे बटन दिसेल यावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील यापैकी कृषी यांत्रिकीकरण यापुढे तुम्हाला बाबी निवडा हे बटन दिसेल यावरती क्लिक करा.
आता या ठिकाणी अर्जदाराला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायवाची टच करा.
आता या ठिकाणी तुम्हाला तपशील निवडायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हा या पर्यायावर टच करायचे आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये तुम्हाला फॉरेन ग्रास अँड रेसिडेंट मॅनेजमेंट हा पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची मशीन हवी आहे आता या ठिकाणी तीन प्रकार तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यापैकी तुम्हाला कोणते मशीन हवी आहे ते तुम्हाला निवडायचे. यामध्ये तुम्हाला तीन एचपी पेक्षा कमी किंवा तीन एचपी पेक्षा जास्त मशीन उपलब्ध आहे.
ही संपूर्ण माहिती योग्य रित्या भरल्यानंतर खालील हिरव्या बटणावर म्हणजेच जतन करा या बटणावरती टच करा.
आता तुम्हाला एक मेसेज दिसेल घटक तपशील यशस्वीरित्या जोडला. जर तुम्हाला यामध्ये आणखी काही घटक कागदपत्रे अपलोड करायचे असेल किंवा जोडायचे असेल तर या ठिकाणी yes करा जर तुमची माहिती ही पुरेपूर योग्य असेल तर no करा.
ही आपल्या अर्जाची संपूर्ण बाब आपण निवडलेली आहे. आता शेवटचे काम म्हणजे आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे हा अर्ज सादर आहे. यासाठी परत एकदा आपल्याला होम पेजवर यावे लागणार आहे.
होमपेज वर आल्यानंतर आपल्याला सर्वात वरती एक पर्याय दिसेल अर्ज सादर करा यावरती टच करा.
ज्या बाबी आपण निवडले आहे ते आपल्याला या ठिकाणी पहा या बटनावर टच करून पाहायला मिळणार आहे.
या ठिकाणी तुम्हाला जी योजना सर्वात पहिल्या हवी असेल तिच्यासाठी तुम्ही प्राधान्य सुद्धा देऊ शकता. याखाली तुम्हाला अटी आणि शर्ती मान्य आहे या पर्यायावरची टिक करायचे आहे आणि हिरव्या बटणावर म्हणजेच अर्थ सादर करा यावरती टच करायचे आहे.
आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागणार आहे हे पेमेंट तुम्हाला 23.60 पैसे इतके करावे लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला याची पावती सुद्धा मिळणार आहे ही पावती तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सेव करून ठेवू शकता.
तुमचा अर्ज यशस्वीरित्या या ठिकाणी सादर झालेला आहे.