डिझेल पंप सबसिडी योजना 2024 मिळणार ५० टक्के अनुदान

महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागातर्फे आता डिझेल पंप सबसिडी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डिझेल पंपासाठी अनुदान देण्यात येते.

पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 50 टक्के इतके अनुदान देण्यात येते जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचणी येणार नाही.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा आणि महत्त्वाची लागणारी कोण कोणती कागदपत्रे आहे ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे.

डिझेल पंपासाठी 50% अनुदानाचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे या अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे. लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये व्हिडिओ सहित दिलेली आहे.

डिझेल पंप सबसिडी योजना अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडणार आहे हे कागदपत्रे कोणती आहे बघा खालील प्रमाणे.

जु लाभार्थी अर्ज करणार आहे त्याचे आधार कार्ड.

मोबाईल क्रमांक.

बँकेची संपूर्ण माहिती पासबुक सहित.

लाभार्थी कोणत्या ठिकाणचा आहे (रहिवासी प्रमाणपत्र)

छायाचित्रे (पासपोर्ट फोटो).

शपथ पत्र.

ई-मेल आयडी.

रेशन कार्ड.

अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा आणि आठ अ.

वरील ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांना अर्ज करताना लागणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.

जर तुम्ही या संकेतस्थळावर पहिल्यांदा आले असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या बटणावर क्लिक करायचे आहे.

नवीन अर्जदार नोंदणी ही अतिशय सोपी आहे तुम्हाला काही माहिती विचारल्या जाईल ती माहिती योग्यरीत्या भरा तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाची लिंक असावा.

यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड भेटेल हा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा असे एक निळे बटन दिसेल त्यावरती टच करा.

आता तुम्हाला तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसेल. यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायापुढील बाबी निवडा या बटणावर टच करा.

आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की लाभार्थ्याचे गाव, जिल्हा, तालुका  व इतर बरीच माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करून पुन्हा एकदा होम पेजवर यायची आहे या ठिकाणी तुम्हाला वरती एक पर्याय दिसेल अर्ज सादर करा त्यावर टच करा.

तुम्ही केलेले सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसेल या अर्जदारांना तुम्ही प्रधान्य  देऊ शकता.

यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या बटणावर टच करायची आहे.

आता तुम्हाला या अर्जाची शुल्क म्हणून 23 रुपये 60 पैसे भरायचे आहे.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती तुम्ही तुमच्या जवळ जतन करून ठेवू शकता किंवा या पावतीची तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता.

डिझेल पंप योजना स्वरूप आणि उद्देश

डिझेल पंप सबसिडी अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विविध साधने उपलब्ध करून देणे आहे. शेतकऱ्यांकडे प्रत्येक वेळेस वीज उपलब्ध नसते या कारणामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी बरीच तडजोड करावी लागते परंतु या डिझेल पंप योजना अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना विजेची जास्त गरज नाही ही बाब लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र सौर कृषी पंप ९० टक्के अनुदान मिळणार

एकूण 50% लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला स्वखर्चातून भरावी लागणार आहे.

Leave a Comment