Bandhkam Kamgar Renewal 2024 बांधकाम कामगार नूतनीकरण

ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना आता याचे नूतनीकरण म्हणजेच बांधकाम कामगार नूतनीकरण किंवा रिन्यूअल करावे लागणार आहे. हे रिन्यूअल करणे गरजेचे असते लाभार्थ्याला प्रत्येक वर्षी बांधकाम कामगार रिन्यूअल करणे आवश्यक असते.

जर हे रिन्यूअल केले नाही तर लाभार्थ्याला पुढील योजनांचा लाभ भेटत नाही त्यामुळे हे रिन्यूअल करणे आवश्यक होऊन आहे. तुमचे सुद्धा बांधकाम कामगार रिन्यूअल झाले नसेल तर या लेखांमध्ये आपण बघणार आहोत की बांधकाम कामगार रिन्यूअल कसे करायचे कोठे करायचे व हे रिन्यूअल करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

सध्या बांधकाम कामगार नूतनीकरण हे बंद करण्यात आलेले आहे. बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण हे लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.

बांधकाम कामगार नूतनीकरण अशा पद्धतीने करा

बांधकाम कामगार रिन्यूअल करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जा.

वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक चौकट दिसेल त्या चौकटीवर क्लिक करा आणि न्यू रिन्यूअल या पर्यायावर टच करा.

याखाली तुम्हाला पुन्हा एक चौकट दिसेल त्या चौकटीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला या खाली प्रोसिड टू फॉर्म असे एक बटन दिसेल त्या बटणावर टच करा.

आता तुमच्यासमोर परत एक फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरायची आहे ही माहिती कशाप्रकारे भरायची आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ सुद्धा बघू शकता

यूट्यूब व्हिडिओ

ज्या वेळेस तुम्ही ही बांधकाम कामगार नोंदणी केली होती त्या वेळेला तुम्ही जी माहिती या ठिकाणी भरलेली होती तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल यामध्ये तुम्हाला जास्त काही बदल करण्याची गरज नाही.

या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक.

नेम ऑफ कन्स्ट्रक्टर म्हणजेच विकासकाचे नाव.

ठेकेदाराच्या कंपनीचे नाव.

भ्रमणध्वनी क्रमांक.

लाभार्थी कोणत्या प्रकारचे काम करतो याचा प्रकार.

ज्या ठिकाणी लाभार्थ्याचे काम चालू आहे की जागा निवडा.

त्यानंतर लाभार्थ्याला स्वतःचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.

याखाली नियुक्ती दिनांक टाका.

यापुढे प्रेषण दिनांक टाका.

कामाचे स्वरूप निवडा.

लाभार्थ्याने 90 दिवस काम केलेले आहे याबद्दल लाभार्थ्याला काही तपशील भरावी लागणार आहे जसे की जारी करणाऱ्याचा प्रकार.

ग्रामसेवकाचे नाव.

जावक क्रमांक.

नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्याची दिनांक.

ग्रामपंचायत चे नाव जिल्हा आणि तालुका निवडा.

याखाली तुम्हाला एक चौकट दिसेल या चौकटीमध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे जशी की मी नियोक्त्याचा प्रकार.

संपूर्ण नाव.

भ्रमणध्वनी क्रमांक.

ज्या तारखेपासून हे सर्टिफिकेट दिली आहे त्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत चालणार आहे ही तारीख निवडा.

आता या ठिकाणी तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे ही कागदपत्रे कशी आणि कोणती आहे बघा खालील प्रमाणे.

लाभार्थ्यांनी 90 दिवस काम केले याची प्रमाणपत्र.

बांधकाम कामगार मंडळाची ओळखपत्र किंवा मागील रिन्यूअलची पावती.

लाभार्थ्याची स्वयंघोषणापत्र.

या कागदपत्रांची साईज 2 mb किंवा 2 mb पेक्षा कमी असावी.

ही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली एक निळ्या कलर मध्ये सेव्ह असे बटन दिसेल या बटणावर टच करा.

जसे तुम्ही या बटणावरती टच कराल त्यावेळेस तुम्हाला सेंड ओटीपी असे एक बटन दिसेल यावरती परत टच करा.

तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी पाठवल्या जाईल तो ओटीपी या चौकटीमध्ये टाका.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी या बटनावरती टच करायचे आहे.

आता तुम्हाला एक मेसेज दिसेल यामध्ये तुमचा पावती नंबर आहे.

अशाप्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बांधकाम कामगार रिन्यूअल करू शकता ही पद्धत अतिशय सोपी आहे.

बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण हे सध्या काही कारणास्तव बंद करण्यात आलेले आहे. तरी हे लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.

बांधकाम कामगार नोंदणी

Leave a Comment