ज्या लाभार्थ्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे त्यांच्या मुलांना मिळणार ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्यसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे आणि हा अर्ज कोठे सादर करावा लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ही योजना बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविली जाणारी एक योजना आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येते. ही मदतीची रक्कम लाभार्थ्याला २० हजारापासून ते ५० हजारांपर्यंत देण्यात येते. यासाठी लाभार्थ्याची बांधकाम कामगार नोंदणी ही सक्रीय असावी आणि नुतनीकरण हे प्रत्तेक वर्षाला करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना असा करा ऑनलाईन कर्ज
अर्ज करण्यसाठी तुम्हाला बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
आता याठिकाणी तुम्हला एक चौकट दिसेल त्यामध्ये new claim हा पर्याय निवडा.
याखालच्या चौकटीमध्ये लाभार्थ्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.
नोंदणी क्रमांक टाकल्यावर proceed to form या बटनावर टच करायचे आहे.
आता तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP पाठविण्यात येईल तो OTP या चौकटीमध्ये टाका.
याठिकाणी तुम्हाला योजना श्रेणीमध्ये शैक्षणिक कल्याण योजना निवडायची आहे.
अधिक माहितीसाठी खलील व्हिडीओ पहा.
श्रेणी निवडल्यानंतर लाभार्थ्याला या ठिकाणी योजनेचे स्वरूप दिसेल.
तुमचा पाल्य ज्या वर्गात शिकत असेल त्याप्रमाणे तुम्हाला श्रेणी निवडायची आहे.
यानंतर लाभार्थ्याच्या पाल्याचे नाव याठिकाणी आपोआप आलेले असेल.
पाल्य कोणत्या वर्गात शिकत आहे हे निवडा.
पाल्याच्या शाळेचे नाव टाका.
ज्या शाळेमध्ये पाल्य शिकत आहे त्या शाळेचा पत्ता सुद्धा याठिकाणी टाकायचा आहे.
ज्या वर्षी पाल्य उत्तीर्ण झाला आहे ते वर्ष निवडा.
ही संपूर्ण माहिती योग्य रित्या भरल्यावर तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक लागणार आहे. ही कागदपत्रे लाभार्थ्याला याठिकाणी उपलोड करावी लागणार आहे. कागदपत्रे उपलोड करताना २ mb किंवा यापेक्षा कमी साईझ असावी.
कोणते कागदपत्रे लागणार आहे बघा खालीलप्रमाणे.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्याच्या पाल्याची शाळेची उपस्थिती ७५ टक्के किंवा यापेक्षा जास्त आहे याचे प्रमापात्र.
शाळेच बोनाफाईड प्रमाणपत्र.
पाल्याचे आधार कार्ड.
रेशन कार्ड.
स्वयंघोषणापत्र.
वरील ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.
हे कागदपत्रे तुम्हला याठिकाणी उपलोड करायची आहे.