शेळीपालन योजना ahilya sheli yojana 2024

शेळी पालन करण्यासाठी राबवली जाणारी ही अहिल्या शेळी योजना आहे ahilya sheli yojana.या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर शेळ्या देण्यात येते.

अहिल्या शेळी योजना अंतर्गत १० शेळ्या आणि १ बोकड या प्रमाणावर शेळ्या देण्यात येते. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे कोणती लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहे या शर्ती कोणत्या आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे बघा माहिती खालील प्रमाणे.

ahilya sheli yojana कोणते लाभार्थी आहे पात्र

ज्या लाभार्थ्याला अर्ज करायचा आहे त्याचे वय 18 वर्षे यापेक्षा जास्त असावे आणि 60 वर्ष यापेक्षा कमी असावे.

या योजनेचा लाभ फक्त महिला प्रवर्गाला देण्यात येणार आहे म्हणजेच अहिल्या शेळी योजना साठी फक्त महिलाच पात्र असणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मागील तीन वर्षात या प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अन्यथा अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

एका परिवारातील एकच महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे.

लाभार्थ्याच्या परिवारातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा.

ज्या महिला दारिद्र रेषेच्या प्रवर्गात असेल किंवा अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गात असेल त्याच महिलांना लाभ देण्यात येणार आहे.

अहिल्या शेळी योजना लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे तरच लाभार्थ्याची अर्ज स्वीकारण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला प्ले स्टोर वरून एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे आणि त्या ॲपमध्ये लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे आहे बघा खालील प्रमाणे.

ahilya sheli yojana असा करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज

अहिल्या शेळी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला प्लेस्टोर वरून अहिल्या योजना हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे आणि या ॲप मध्ये लाभार्थ्याला अर्जाची नोंदणी करावी लागणार आहे.

आता या ठिकाणी तुम्हाला एक इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा एक थोडक्यात ही माहिती दिसेल जशी की सर्वात पहिली तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे.

 यानंतर लाभार्थ्याची प्राथमिक निवड करण्यात येईल.

प्राथमिक निवड झाल्यानंतर लाभार्थ्याची अंतिम निवड करण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील नोंदणी करा या बटणावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक चौकटीमध्ये टाकायचा आहे.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉगिन व्हाल आता तुम्हाला या ठिकाणी दोन पर्याय दिसेल पहिला पर्याय म्हणजे सबमिट एप्लीकेशन आणि दुसरा पर्याय म्हणजे व्यू एप्लीकेशन.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला सबमिट एप्लीकेशन या पर्यायावरती टच करायचे आहे पर्यावरण टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे.

आवश्यक कागदपत्रे

महिला लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड.

बँक पासबुक तपशील.

सेल्फ डिक्लेरेशन (स्वयंघोषणा प्रमाणपत्र).

जमिनीचा सातबारा.

लाभार्थी कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे याचे प्रमाणपत्र.

कास्ट सर्टिफिकेट.

आपत्य प्रमाणपत्र.

वरील हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.

गाव तिथे गोदाम योजना

Leave a Comment