शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले आहेत हे आज पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत सुरू झालेले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे हा अर्ज तुम्हाला पीएम विश्वकर्मा अधिकृत संकेतस्थळावर करावा लागणार आहे.
अर्ज कसा करायचा कोठे करायचा व अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून अर्ज करताना लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जाची रक्कम एकूण 1 लाख अशी आहे. यासाठी वार्षिक 5 टक्के व्याज दराने दिले जाते.
ही योजना महिलांसाठी राबवली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी एकूण 15000 अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे व कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
शिलाई मशीन योजना असा करा ऑनलाईन अर्ज
लाभार्थ्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज पीएम विश्वकर्मा या अधिकृत संकेतस्थळावर करावा लागणार आहे.
शिलाई मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा या संकेतस्थळावर जायचे आहे खालील बटणावर टच करून सुद्धा तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकतात.
या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर वर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात लॉगिन असे एक बटन दिसेल त्यावर टच करा.
या ठिकाणी जर तुमचे पहिलेच अकाउंट असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करावे लागणार आहे.
जर तुमचे या ठिकाणी अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचे अकाउंट तयार करावे लागेल.
जर तुम्हाला या संकेतस्थळावरून अर्ज करता येत नसेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र मधून अर्ज करायचा आहे.
या ठिकाणी आपण CSC लॉगिन मधून CSC Register Artisans या पद्धतीने नुसार लॉगिन करून अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर नावाच्या खाली तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येईल या दोन्ही ऑप्शन वरती क्लिक करा आणि CONTINUE या बटणावरती टच करा.
ज्या महिलाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेची आधार कार्ड ची काही तपशील या ठिकाणी टाकावी लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी आधार वेरिफिकेशन करावे लागणार आहे.
आदर Verify करण्यासाठी जो मोबाईल क्रमांक आधारकार्ड ला लिंक आहे तो वरच्या रकाण्यामध्ये टाका आणि त्याखाली महिलेचा बारा अंकी आधार क्रमांक टाका त्यानंतर Captcha भरा खालच्या Condition टिक करा आणि CONTINUE या बटणावरती पुन्हा क्लिक करा.
आधार कार्ड ची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर जो मोबाईल क्रमांक आधार काढला लिंक आहे त्यावर एक आधार वेरिफिकेशनचा ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी खालील चौकटीमध्ये टाका.
यानंतर या ठिकाणी बायोमेट्रिक्सने सुद्धा व्हेरिफाय करावे लागणार आहे. अर्जदार महिलेचा अंगठा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्या अर्जदार महिलेची संपूर्ण तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यामध्ये फक्त महिलेची विवाह स्थिती आणि कॅटेगिरी निवडण्याची गरज आहे.
या ठिकाणी तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरण्याची गरज आहे.
या ठिकाणी थोडे खाली आल्यावर तुम्हाला परिवाराची माहिती म्हणजेच Family Details भरावे लागणार आहे.
फॅमिली डिटेल्स मध्ये रेशन कार्ड नंबर गरज आहे हा रेशन कार्ड नंबर या ठिकाणी आपोआप आलेला असेल आणि या खाली तुमच्या फॅमिली मधील म्हणजे परिवारामधील जी काही महिला सदस्य आहे त्यांची नावे सुद्धा खाली दिसेल.
ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिल्याच्या नावासमोरील डिलीट या रकान्यामध्ये टिक करा.
जर तुमच्या परिवारातील ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा असेल त्याच व्यक्तीचे नाव या ठिकाणी दाखवत नसेल तर या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तींची नावे ऍड सुद्धा करू शकता.
त्यानंतर आधार ऍड्रेस संबंधित काही वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे
या खाली एक महत्त्वाचे ऑप्शन आहे ते म्हणजेच Profession/Trade details.
यामध्ये Profession/Trade details Name मध्ये तुम्हाला टेलर निवडायचे आहे.
एखादी तुम्हाला Business Address विचारला जाईल तो सेम एस आधार विचारला जाईल तो same as Aadhar address या पर्यायाला टच करा (address भरण्याची माहिती ही लाभार्थ्यावर डिपेंड आहे).
ही संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरलेली आहे याची खात्री करा आणि या खाली दिसणाऱ्या save बटणावर टच करा.
आता या ठिकाणी Saving Bank Details (सेविंग बँक डिटेल्स) भरावी लागणार आहे.
यामध्ये नेम ऑफ बँक म्हणजेच बँकेचे नाव आयएफएससी कोड नेम ऑफ ब्रांच म्हणजे बँक शाखेचे नाव आणि कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे महिला लाभार्थीचा जो अकाउंट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे.
याखाली तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसेल Credit Support क्रेडिट सपोर्ट म्हणजेच तुम्हाला लोन ची आवश्यकता आहे का यामध्ये तुम्हाला एक लाख लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी फक्त वार्षिक पाच टक्के व्याजदर असणार आहे हे लोन 18 महिन्याकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जर तुम्हाला या कर्जाची गरज असेल तर या मेबी लेटर वर टच करून तुम्हाला एस हा पर्याय निवडायचा आहे आणि किती लोन हवे आहेत ते खालच्या रकान्यामध्ये टाकून काही माहिती भरायची आहे. ही माहिती तुम्हाला वैयक्तिकरित्या भरावी लागणार आहे. लिहून घेण्यासाठी कमीत कमी रक्कम ही 50 हजार आहे आणि जास्तीत जास्त रक्कम ही एक लाख रुपये आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला Save या पर्यायावरती टच करायचे आहे त्यानंतर तुम्हाला काही माहिती जास्त भरण्याची गरज नाही त्यानंतर तुम्हाला Declaration Details हे पेज ओपन झाल्यानंतर सबमिट या बटनावर टच करून सबमिट करायचे आहे.
Submit केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन सबमिट असा एक मेसेज दिसेल यामध्ये तुम्हाला एप्लीकेशन नंबर सुद्धा देण्यात येणार आहे.
अर्ध सबमिट केल्यानंतर तुम्ही अर्ज डाऊनलोड सुद्धा करू शकता किंवा याची प्रिंट सुद्धा काढू शकता.
हा अर्ज घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जायचे आहे आणि ग्रामपंचायत मधून तुम्हाला हा अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे.
अशाप्रकारे तुम्ही या शिलाई मशीन योजना अर्जासाठी अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला 15000 इतके अनुदान देण्यात येणार आहे व एक लाख रुपये कर्ज सुद्धा 18 महिन्यासाठी फक्त वार्षिक पाच टक्के व्याजदरावर देण्यात येणार आहे.