संजय गांधी निराधार योजना 4 महिन्याचे पैसे मिळणार sanjay gandhi niradhar yojana 2024

संजय गांधी निराधार योजना चे जे लाभार्थी आहे त्यांना चार महिन्याचे पैसे मिळणार आहेत या संदर्भात शासनातर्फे अधिकृत जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे.

तुमच्या परिवारातील एखादा व्यक्ती या संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असेल किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या संदर्भात सविस्तर जीआर बघा.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्याला प्रति महिन्याला जर एक हजार पाचशे इतका निधी मिळत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत किती निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व हा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

पात्र लाभार्थ्यांना एकूण चार महिन्याच्या निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात अधिकृत माहिती सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. हा जीआर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभाग अंतर्गत हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. 

संजय गांधी निराधार योजना बघा जीआर सविस्तर माहिती

शासनाचा अधिकृत जीआर हा दिनांक 8 एप्रिल 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे. हा अधिकृत जीआर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे.

या शासन निर्णयामध्ये किती निधी वितरित करण्यात येणार आहे व कसा करण्यात येणार आहे यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे ही संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार सन 2024 25 या आर्थिक वर्षा करिता 41,87,48,760/ इतका निधी या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजूर करण्यात येणार आहे. हा निधी 2024 मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये मंजूर करण्यात येणार आहे.

या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार वृद्ध व भूमिहीन नागरिकांना सुद्धा काही आर्थिक मदत देण्यात येणार आहे यासाठी निधी सुद्धा ठरवून दिलेला आहे. 17,17,25,840/ एकूण इतकी रक्कम ही ठरवून दिलेली आहे. यामध्ये वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना 4,29,31,460/ इतकी रक्कम तर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी रुपये10,46,87,190/ इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

या जीआर मध्ये पृष्ठ क्रमांक तीनवर तुम्हाला वितरण पत्रिका अ आणि वितरण पत्रिका ब सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या वितरण पत्रिकामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती वेतन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही संपूर्ण तपशील या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

लेक लाडकी योजना

जीआर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर टच करा.

Leave a Comment