पाईपलाईन अनुदान योजना pvc pipe anudan yojana 2024

पाईपलाईन अनुदान योजना प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये पाईपलाईन करणे गरजेचे असते पाईपलाईन केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी अतिशय मदत होते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे पाईपलाईन नसेल तर शेतकऱ्याला पिकांना पाणी देण्यासाठी खूप अडचणी येते.

पाईपलाईन करण्यासाठी मुख्य गोष्ट जी आवश्यक असते ती म्हणजे पीव्हीसी पाईप. या पाईप साठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे व या हनुमानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पाईप साठी शेतकऱ्यांना 35 रुपये प्रति मीटर इतकी अनुदान देण्यात येते तसेच हे अनुदान 428 मीटर पर्यंत देण्यात येते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थ्याला महाडीबीटी फार्मर लॉगिन या अधिकृत संकेतस्थळावर करावा लागणार आहे.

पाईपलाईन करणे ही प्रत्येक शेतकऱ्याची गरज असते आता ही एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज नक्की करा आणि या योजनेचा लाभ नक्कीच घ्या. पाईपलाईन अनुदान योजना साठी अर्ज कसा करायचा बघा खालील प्रमाणे संपूर्ण माहिती.

पाईपलाईन अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

पाईपलाईन अनुदान योजना लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा ऑनलाइन अर्ज तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन या अधिकृत संकेतस्थळावर करावा लागणार आहे या ठिकाणी आपण पहिले सुद्धा बरेच अर्ज केलेले आहेत.

महाडीबीटी फार्मर लॉगिन या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड किंवा बायोमेट्रिक टाकून लॉगिन करून घ्यायची आहे जर तुमची या ठिकाणी आयडी नसेल किंवा या ठिकाणी तुम्ही पहिल्या वेळेस आलेले असाल तर तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागणार आहे.

लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा असा एक रकाना दिसेल या रकान्यामध्ये एक निळे बटन आहे अर्ज करा यावरती टच करा. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसतील.

यामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोरील बाबी निवडा या पर्यायावर टच करायची आहे. आता तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल या अर्जामध्ये तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे.

या अर्जामध्ये तुम्हाला तुमची गाव तालुका आणि मुख्य घटक म्हणजे सिंचन साधने आणि सुविधा हे निवडायचे आहे पाईप्स सर्वेक्ष क्रमांक किंवा गट क्रमांक हा तुम्ही तुम्हाला तुमच्या सातबारा नुसार टाकायचा आहे घटकांमध्ये उपघटकांमध्ये तुम्हाला भरपूर पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला जो पाईप हवा आहे तो पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला पाईपची लांबी मीटर मध्ये निवडायची आहे ही जास्तीत जास्त लांबी 428 मीटर पर्यंत असते म्हणजेच कमीत कमी 60 मीटर आणि जास्तीत जास्त 428 मीटर इतका हा अर्जदाराला देण्यात येणार आहे.

ही संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्हाला बाब जतन करा या बटणावरती टच करायचे आहे. आपला अर्ज हा फक्त आपण भरलेला आहेत अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला परत एकदा मुखपृष्ठावर जायचे आहे.

आता परत या ठिकाणी अर्ज करा या बटणावर टच करा. परत तुम्ही या ठिकाणी त्याच पेजवर आलेले असाल आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा बऱ्याच बाबी दिसेल बऱ्याच योजना दिसेल यापैकी तुम्हाला सर्वात वरच्या अर्ज सादर करा या निळ्या बटणावर टच करायचे आहे. पेज ओपन झाल्यानंतर पहा या पर्यायावर क्लिक करा.

जी बाब अर्जदारांनी निवडलेली आहे ती बाब अर्जुना या ठिकाणी दाखवण्यात येईल. ज्या योजनेचा लाभ लाभार्थ्याला घ्यायचा आहे त्यासाठी प्रधान्य क्रमांक द्यावे लागणार आहे. या खाली योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल त्या योजना सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील या बटणावर टिक करून अर्ज सादर करा या हिरव्या रंगाच्या बटणावर टच करा.

हा अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराला काही रक्कम द्यावी लागणार आहे म्हणजेच शुल्क द्यावी लागणार आहे ही शुल्क 23 रुपये 60 पैसे इतकी असणार आहे.

हे शुल्क भरण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या मेक पेमेंट्स या बटणावरती टच करा. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बरेचसे पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे यापैकी तुम्हाला जो पर्याय अतिशय सुरक्षित आणि सोपा वाटेल त्या पर्यावर तुम्ही टच करून तुमची पेमेंट या ठिकाणी करू शकता.

जर या ठिकाणी आता तुमच्या अर्जाची निवड झाली तर निवड झाल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे ही कागदपत्रे तुम्हाला निवड झाल्यावरच अपलोड करावे लागणार आहे आणि ही संपूर्ण सूचना तुम्हाला या महाडीबीटी फार्मर लॉगिन च्या अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल.

अशाप्रकारे तुम्ही पाईपलाईन मध्ये लागणाऱ्या पाईप अनुदान साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

लेक लाडकी योजना

Leave a Comment