वर्ष 2023 मध्ये जर तुम्ही पिक विमा भरला असेल आणि तो पीक विमा तुम्हाला अद्यापही मिळाला नसेल किंवा मिळणार असेल तर पिक विमा 2023 ऑनलाइन स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे तपासायचे हे अगदी काही मिनिटात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
या ठिकाणी आपण हे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासणार आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती होईल. पिक विमा माहिती बघण्यासाठी शासनाचे अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे याच वेबसाईटवर आपल्याला ही संपूर्ण माहिती बघायची आहे.
ही माहिती तपासण्यासाठी मात्र तुम्ही 2023 यावर्षी पिक विमा भरलेला असावा तेव्हाच तुम्ही ही माहिती ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता.
पिक विमा 2023 ची माहिती बघण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहे का, ही माहिती कशी बघायची व कोठे बघायची हे संपूर्ण माहिती बघा खालील प्रमाणे सविस्तरपणे.
पिक विमा 2023 ऑनलाइन स्टेटस अशा पद्धतीने तपासा
जो पीक विमा तुम्ही 2023 मध्ये भरलेला आहे त्याचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझर मध्ये PMFBY या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
ही अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे पर्याय दिसेल या पर्यायांपैकी तुम्हाला एप्लीकेशन स्टेटस या पर्यायावर टच करायचे आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर परत एक नवीन पेज तयार होईल या पेजवर तुम्हाला Reciept Number टाकायचा आहे. हा नंबर तुम्हाला तुम्ही भरलेल्या पिक विमा च्या पावतीवर दिसे.
हा नंबर तुम्हाला न चुकता व्यवस्थित रित्या या चौकटीमध्ये टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपच्या सुद्धा भरावा लागणार आहे हा कॅप्चा सुद्धा तुम्हाला न चुकता भरायचा आहे.
ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पिवळ्या रंगांमध्ये Check Status या बटनावर ती टच करायचे आहे.
या बटनावरती टच करतात तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीची माहिती डिटेल्स भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्याचे नाव, scheme, Season, Year आणि source कोणता आहे ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल.
पिक विमा स्टेटस कसे आहे हे बघण्यासाठी तुम्हाला या पेजला थोडी खाली स्क्रोल करायचे आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता.
अधिक माहिती
तुम्ही जर एक शेतकरी असाल व तुम्हाला शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन करायची असेल तर आता पीव्हीसी पाईप वर अनुदान मिळणार आहे हे अनुदान किती मिळणार आहे व कसे मिळणार आहे या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा व कुठे करायचा ही संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकऱ्यांसाठी अशाच नवनवीन पद्धतीच्या शासकीय योजना व नवीन अपडेट या वेबसाईटवर आम्ही देत असतो. पुढची योजना किंवा अपडेट तुमच्यापासून चुकू नये म्हणून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आम्ही प्रत्येक अपडेट देत असतो. तुम्ही आमचे इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे.