PM किसान योजना हफ्ता शेतकरी कल्याणसाठी राबवली जाणारी एक योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष सहा हजार रुपये इतका निधी बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतो. बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ का मिळत नाही व या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पर्याय काही उपाय आहे का ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांची इ केवायसी आधार वेरिफिकेशन आणि ज्या इतर काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण असूनही या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही.
तुमचा हप्ता अडकलेला आहे का किंवा तुम्हाला तुमचा पुढचा हप्ता मिळणार आहे का? ही जर अधिकृत माहिती तुम्हाला बघायची असेल तर यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
ज्या लाभार्थ्यांना आता सध्या या योजनेची हफ्ते मिळत आहे त्यांना सुद्धा भविष्यात अडचणी येऊ शकतात त्यांचा सुद्धा हप्ता या ठिकाणी रोखला जाऊ शकतो. या योजनेचे संपूर्ण हफ्ते लाभ कसा घ्यावा ही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत.
PM किसान योजना हफ्ता का येत नाही कारण बघा
या योजने संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले पी एम किसान सन्मान निधी या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
या विषयावर आल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एक नवीन पेज ओपन होईल. या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे.
ही माहिती बघण्यासाठी पहिले खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला शेवटच्या रूममध्ये स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन फार्मर सीएससी फार्मर असा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल या पेज मध्ये तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सर्च या निळ्या बटणावर टच करायचे आहे.
सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर एप्लीकेशन स्टेटस म्हणजेच शेतकरी अर्जाची स्थिती बघायला मिळणार आहे. लाभार्थ्याच्या अर्जामध्ये जर काही चुकी असेल तर या ठिकाणी लाभार्थ्याला ती चुकी लगेच कळवण्यात येईल. जर अर्ज एकदम ओके असेल तर परत एकदा मागे या.
मुखपृष्ठावर आल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी परत बरेच पर्याय दिसतील या पर्याय पैकी तुम्हाला नो युवर स्टेटस या पर्यायावर टच करायचे आहे.
आता या ठिकाणी परत तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन क्रमांक आणि कॅपच्या भरायचा आहे. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन क्रमांक असेल तर तुम्ही वरील नो युवर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावरण सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती करून घेऊ शकता.
या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही जो नंबर इ केवायसी करताना या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या पुढील चौकटीत टाका.
आता या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याची किंवा लाभार्थ्याची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल. याच पेजला थोडे खालीच कॉल करा थोडंच खाली स्क्रोल गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 पर्याय दिसतील 1.ELIGIBILITY STATUS
2.REASON OF INELIGIBILITY (IF ANY) 3.LATEST INSTALLMENTS DETAILS
पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही अर्जाची पात्रता अर्जाची स्थिती बघू शकता जर या ठिकाणी काही चूक असेल तर ती दुरुस्त करा जर काही चूक नसेल तर पुढील पर्यायावर क्लिक करा.
दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की जर हफ्ता मिळत नसेल आणि यासाठी काही कारण असेल तर ते कारण कोणता आहे आणि हफ्ता बंद होण्याची तारीख किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या दुसऱ्या पर्यायांमध्ये दाखवून देईल.
जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर या ठिकाणी ही संपूर्ण माहिती लाभार्थ्याला दाखवण्यात येईल या ठिकाणी कारण सुद्धा लाभार्थ्याला देण्यात येणार आहे की कोणत्या कारणामुळे लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून.
या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जर तुमची समस्या सुटत नसेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्याचे ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जावे लागणार आहे तहसीलमध्ये या पी एम किसान योजना साठी एक स्वतंत्र ऑफिस असते या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे आणि तुमची जी काही समस्या आहे ती या ठिकाणी मांडावी लागणार आहे. PM किसान योजना हफ्ता.