post office ppf scheme 2024 पोस्ट ऑफिस PPF योजना

पोस्ट ऑफिस PPF योजना ही खूप चांगल्या प्रकारची योजना आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्याला 32 लाखापर्यंत लाभ मिळू शकतो हा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोणत्या पात्रता आहे आणि कागदपत्रे आवश्यक आहे का कोणत्या अटी आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पोस्ट ऑफिस PPF योजना लाभ घेण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करू शकता व ही गुंतवणूक कशा पद्धतीने करायची ही संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जर तुम्ही या योजनेमध्ये दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली तर याचे परत मला किती मिळेल याचा व्याज किती असेल हे बघूया.

Investment 10,000

Total Contributed Years : 15

Maturity Period : 15

Total Contribution :₹18,00,000

Total Interest :₹13,55,680

Maturity Amount : 31,55,680

अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये जर तुम्ही दहा हजार रुपये गुंतवणूक केली तर एकूण पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला 31 लाख 55 हजार 680 रुपये इतकी रक्कम मिळेल.

ज्यामध्ये तुम्हाला Total Interest :₹13,55,680 इतका बघायला मिळणार आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी 2024 मध्ये गुंतवणूक सुरू करत असाल तर तुम्हाला ही रक्कम परत 2038 मध्ये मिळणार आहे. ही टोटल रक्कम 31,55,680 इतकी रक्कम परत मिळणार आहे.

तुम्हाला किती गुंतवणूक करायची आहे हे बघण्यासाठी तुम्ही PPF Investment Calculator चा वापर करून किती Investment केल्यावर किती रक्कम तुम्हाला परत मिळेल व केव्हा मिळेल ही माहिती PPF Calculator वर बघू शकता.

पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणूक आणि व्याजदर

या योजनेचे मराठीत नाव भविष्य निर्वाह निधी खाते असे आहे. या योजनेचा कालावधी हा एकूण 15 वर्षाचा आहे. या योजनेचा व्याजदर हा 1 जानेवारी 2024 पासून बदलण्यात आलेला आहे. हा व्याजदर 7.1% प्रति वर्ष एवढा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये वार्षिक चक्रवाढ व्याज सुद्धा आहे.

जर तुम्हाला हे खाते उघडायचे असेल तर यासाठी तुम्हाला कमीत कमी रक्कम आणि जास्तीत जास्त रक्कम ही किती ठेवावी लागणार आहे तर यामध्ये कमीत कमी रक्कम ही एकूण पाचशे रुपये (₹500) तर जास्तीत जास्त रक्कम ही एकूण एक लाख पन्नास हजार (₹150,000) इतकी आहे.

अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता आणि अशा पद्धतीचे हे व्याजदर तुम्हाला या ठिकाणी 2024 या आर्थिक वर्षाचे बघायला मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे आणि या योजनेची वैशिष्ट्ये कशाप्रकारे आहे ही संपूर्ण माहिती बघा खालील प्रमाणे.

पोस्ट ऑफिस PPF योजना पात्रता आणि वैशिष्ट्ये

या योजनेचा लाभ भारतीय नागरिकांना मिळणार आहे म्हणजे ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो लाभार्थी भारतीय असायला हवा.

ज्या अल्पवयीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती त्यांच्या पालकांच्या साहाय्याने सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला या योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही फक्त एकच खाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी उघडू शकता.

कमीत कमी गुंतवणूक तुम्ही या ठिकाणी 500 रुपये तर जास्तीत जास्त गुंतवणूक या ठिकाणी 150,000  करू शकता.

यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयकर कलम 80c यानुसार ठेवी वजावटी पात्र ठरवण्यात येणार आहे.

जर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमची रक्कम म्हणजेच तुम्हाला जितकी गुंतवणूक करायची आहे तेवढी रक्कम जर तुम्ही एका आर्थिक वर्षात जमा केली नाही तुमच्या PPF खात्यामध्ये तर तुमची हे खाते बंद करण्यात येईल.

PPF खाते बंद झाल्यावर या खात्यामधून तुम्ही कर्ज सुद्धा काढू शकत नाही.

जर हे कधी तुम्हाला पुनर्जीवित करायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमची रक्कम प्लस काही अधिक रक्कम देऊन तुम्ही हे खाते पुनर्जीवित करू शकता.

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी हे व्याजदर तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल जाईल म्हणजेच जसे ही एखाद्या आर्थिक वर्ष समाप्त होण्यास येईल तसेच तुमच्या खात्यामध्ये जी काही रक्कम झालेली आहे ती जमा करून देण्यात येईल.

जेही व्याज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते आयकरच्या कायद्यानुसार करमुक्त ठरणार आहे म्हणजेच या व्याजासाठी काहीही कर नाही.

PPF योजना कर्ज पद्धत

पात्र लाभार्थ्याला जर या योजनेअंतर्गत कर्ज हवी असेल तर त्यासाठी ज्या आर्थिक वर्षापासून लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल म्हणजेच हे खाते उघडले असेल प्रारंभिक वर्गणी केलेली असेल ते वर्ष समाप्ती पासून पाच वर्ष मुदत एवढे कर्ज लाभार्थी या योजनेअंतर्गत घेऊ शकतो.

एका आर्थिक वर्षामध्ये लाभार्थी फक्त एकाच वेळेला हे कर्ज घेऊ शकतो. म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी एकाच वेळेस हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुसऱ्या वेळेस कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. जोपर्यंत पात्र लाभार्थी पहिल्या कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यंत लाभार्थ्याला दुसरे कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.

या योजनेची खाते हे पंधरा वर्षानंतर मॅच्युअर होते. जर तुम्ही हे खाते एकदा बंद केले तर परत तुम्हाला हे खाते सुरू करता येणार नाही.

अशा पद्धतीने तुम्ही या पोस्ट ऑफिस PPF या योजनेचा लाभ घेऊ शकता या ठिकाणी आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघितलेली आहे.

अशाप्रकारे या ठिकाणी तुम्ही फक्त दहा हजार रुपये गुंतवणूक करून 32 लाखापर्यंत लाभ मिळवू शकता.

बाल संगोपन योजना

instagram

Leave a Comment