संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना एक हजार रुपये ते 1500 दिले जाते.
या योजनेचा लाभ कसा घ्यायचा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
संजय गांधी नगर योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही निराधार व्यक्ती आहे जसे की अपंग अंध मानसिक व शारीरिक दृष्टिकोनाने बीमार असलेले वय वृद्ध व्यक्ती आहे या व्यक्तींसाठी ही योजना राबवली जाते. ही योजना 1980 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयोमर्यादा सुद्धा ठरवून दिलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती लाभार्थी पात्र आहे व कशा पद्धतीने या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
संजय गांधी निराधार योजना पात्रता
लाभार्थ्याची वय हे वय वर्ष 65 पेक्षा कमी असावे तरच लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे 21000 किंवा 21 हजारापेक्षा कमी असावे.
अपंग प्रवर्गातील जी काही लाभार्थी आहे ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे जसे की अपंग मूकबधिर मतिमंद इत्यादी अपंग प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
ज्या लाभार्थ्यांना काही गंभीर आजार आहे जसे की पक्षघात कर्करोग सिकल सेल असे काही गंभीर आजार असल्यास तेही लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
निराधार स्त्री निराधार पुरुष निराधार विधवा घटस्फोट झालेल्या महिला अत्याचारित महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे परिवारांना सुद्धा काही आर्थिक मदत देण्यात येणार आहे जसे की ज्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी मात्र एक अट आहे ती म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा परिवार सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अठरा वर्षाखालील अनाथ मुलं.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी पात्रता व डॉक्युमेंट जसे की ज्या ही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो लाभार्थी मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तरच या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला देण्यात येणार आहे.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे आवश्यक पण नाही लागणार आहे ही कागदपत्रे कोणत्या प्रकारे आहे व कसे वापरावे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वात पहिले वयाचा दाखला वयाचा दाखला हा आवश्यक पणे तुम्हाला लागणार आहे.
जो लाभार्थी योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघण्यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा लागणार आहे.
लाभार्थी हा कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे व महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून रहिवासी आहे का यासाठी रहिवासी प्रमाणपत्र हे लागणार आहे.
लाभार्थी कोणत्या प्रकारचा अपंग आहे व किती अपंग आहे यासाठी अपंग प्रमाणपत्र.
लाभार्थी कोणत्या प्रकारचा आजारी आहे किंवा कोणत्या प्रकारचा गंभीर आजारी आहे यासाठी रोगाचा दाखला.
लावा की जर अनाथ असेल तर अनाथ असल्याचा सुद्धा दाखला या ठिकाणी लागणार आहे.
असा करा अर्ज
तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे आणि तुमचा अर्ज तयार करायचा आहे जरी तुम्ही हा अर्ज तयार कराल तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तलाठ्याकडे हा अर्ज जमा करून द्यायचा आहे.
जसे तुम्ही हा अर्ज तलाठ्याकडे जमा करून द्याल तसंही तुमची पुढची प्रक्रिया सुरू होऊन जाईल तलाठी हा अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर करील व तुमच्या अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल.
अशाप्रकारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जसे तुमचे वय वर्ष 65 वर्षे पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला प्रति महिना एक हजार पाचशे रुपये इतकी आर्थिक मदत पेन्शन म्हणून देण्यात येईल.