महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महिलांसाठी पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून महिला सन्मान बचत योजना नवीन योजना राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये महिलांना पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांनी एक फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना त्यांनी भाषणामध्ये जाहीर केली होती. योजना कशी आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे महिलांना आर्थिक मदत या योजनेमधून होणार आहे. प्रत्येक घरात महिला असतात जसे की आपली आई पत्नी किंवा इतर.
जाणून घेऊयात या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते कोणती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.
महिला सन्मान बचत योजना असा घ्या योजनेचा लाभ
ही योजना महिन्यासाठी राबविण्यात येत आहे त्यामुळे या योजनेचा महिला प्रवर्गातील लाभार्थी घेऊ शकतात.
महिला प्रवर्गातील कोणत्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा खालील प्रमाणे.
या योजनेमध्ये प्रत्येक महिला खाते उघडू शकते ज्या महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण आहे त्या महिला या योजनेमध्ये खाते उघडू शकतात.
ज्या महिला किंवा मुली अल्पवयीन आहे त्या त्यांच्या पालकांच्या नावावर सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडू शकतात.
या खात्यामध्ये तुम्हाला काही ठेव सुद्धा करावी लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही शंभर रुपयापासून सुरू करू शकता जी की तुम्ही 100 रुपयांच्या पटीत पुढे सुरू ठेवू शकता.
उघडलेल्या खात्यामध्ये लाभार्थी जास्तीत जास्त दोन लाख रुपये इतकी रक्कम जमा करू शकतो.
महिला सन्मान बचत योजना व्याजदर
या योजनेमध्ये किती व्याजदर आहे व कशाप्रकारे व्याजदर काम करणार आहे बघा माहिती.
या योजनेमध्ये 7.5% व्याजदर देण्यात येणार आहे जे की वार्षिक ठेवीसाठी पात्र असणार आहे.
यामध्ये चक्रवाढ व्याजाचा सुद्धा समावेश असणार आहे ज्या वेळेला लाभार्थी खाते बंद करणार असेल त्यावेळेला लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमचे पैसे हवे असेल तर ज्या तारखेपासून तुम्ही हे खाते उघडले आहे त्या तारखेपासून एका वर्षानंतर तुम्हाला पात्र राहिलेल्या शिल्लक रकमेची 40% पैसे लाभार्थी काढू शकतो.
खाते उघडण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
ज्या महिला लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना हे खाते उघडण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे हे कागदपत्रे कोणत्या प्रकारची आहे बघा खालील प्रमाणे.
खाते उघडण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले हे खाते उघडण्याचा फॉर्म आवश्यक लागणार आहे.
लाभार्थ्याची आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
केवायसी फॉर्म.
तुमच्या पोस्ट बँक मध्ये रक्कम जमा चेक व पि इन स्लीप जमा करावे लागणार आहे.
जर तुम्हाला या योजने संदर्भात खाते उघडायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागणार आहे आणि पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला या योजनेबद्दल चौकशी करावी लागणार आहे.