मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना बद्दल अधिकृत माहिती व जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

ही योजना कशी आहे व कशा पद्धतीने काम करणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्या घटकासाठी अनुदान मिळणार व हे अनुदान किती मिळणार व किती टक्के मिळणार ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण बघणार आहोत.

दिनांक 19 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये तुम्हाला कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे व कोणत्या प्रकारे अनुदान मिळणार आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती शेतकरी पात्र आहे व कोणतेही कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

शाश्वत कृषी सिंचन योजना कोणत्या घटकांसाठी मिळणार अनुदान

या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचन पूरक अनुदान, शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह उभारणी शेडनेट हाऊस उभारणी, वैयक्तिक शेततळे अनुदान व इतर घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

या घटकांसाठी पात्र लाभार्थ्यांना कशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे बघूया अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील जे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी म्हणून आहे त्या शेतकऱ्यांना 55% वर आणि जे उर्वरित शेतकरी आहे यामध्ये मर्यादा आहे पाच हेक्टर त्यांना 45 टक्क्यावर हे अनुदान देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत जे शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना 25% व इतर उर्वरित शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान हे सूक्ष्म सिंचन करिता 80 टक्के व 75 टक्के इतक्या प्रमाणात अनुभव देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी वित्त विभागाकडून सन 2024 25 आर्थिक वर्षाकरिता एकूण 400 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला या योजनेतील असेल तर यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर फॉर्म भरणे आवश्यक आहे जर तुम्ही यासाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर सुद्धा झालेला असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार आहे बघा खालील प्रमाणे.

जर तुमच्याकडेही सुद्धा अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर हे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही येथे क्लिक करून बघू शकता जेणेकरून तुमच्याकडे सुद्धा हे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध असेल व बऱ्याच योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल.

जर तुम्हाला या योजनेचा अधिकृत जीआर हवा असेल तर खालील डाउनलोड या बटनावर टच करून तुम्ही हा जीआर डाउनलोड करू शकता.

Leave a Comment