संजय गांधी नगर योजनेचा लाभ घेण्यासाठी हयात प्रमाणपत्र हे आवश्यक कागदपत्रांमधून एक आहे. जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आयात दाखला हा अत्यावश्यक आहे hayat praman patra.
जर ही हयात प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर संजय गांधी निराधार योजना मधून तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकतात त्यामुळे ही हयात प्रमाणपत्र काढणे अतिशय आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे परंतु त्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही यामागे सर्वात मोठे कारण म्हणजेच हयात प्रमाणपत्र असू शकते.
हे हयात प्रमाणपत्र काय आहे ही प्रमाणपत्र कसे काढायचे यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे का ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा ही हयात प्रमाणपत्र काढू शकता.
hayat praman patra काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला हे प्रमाणपत्र काढायचे असेल तर याच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज आहे. हे कागदपत्रे कोणती आहे बघा खालील प्रमाणे.
यामध्ये सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला पत्त्याचा पुरावा लागणार आहे.
लाभार्थी पॅन कार्ड.
आधार कार्ड.
वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स).
पासपोर्ट.
ओळखपत्र (मतदान कार्ड)
जर तुमच्याकडे हे वरील सर्व कागदपत्रे असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे हयात प्रमाणपत्र काढू शकता या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.
हयात दाखला काढण्यासाठी असा करावे
हयात दाखला जर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी एक दाखला डाऊनलोड करा असे बटन तुम्हाला दिसेल त्या बटणावर क्लिक करून तुम्ही हा दाखला तुमच्या मोबाईलवर पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता.
यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे जशी की ग्रामपंचायत चे नाव तालुका जिल्हा ही माहिती तुम्हाला सर्वात पहिले भरायची आहे यामध्ये तुम्हाला दोन भाषा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पहिली भाषा म्हणजे मराठी आणि दुसरी भाषा म्हणजे इंग्रजी.
वरील माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला दिनांक टाकायचा आहे.
याखाली तुम्हाला परत तुमच्या ग्रामपंचायत चे नाव टाकायचे आहे.
ज्या व्यक्तीला दाखल्याची गरज आहे त्या व्यक्तीची नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे.
ज्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डवर नाव आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नाव टाकावे.
याखाली आधार कार्ड क्रमांक आणि पत्ता टाकायचा आहे.
ही माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी हा दाखला देण्यात येणार आहे त्या दिवशीचा दिनांक या ठिकाणी उल्लेख करण्यात येणार आहे.
या ठिकाणी तुम्हाला सही व शिक्का आवश्यक लागणार आहे हा सही शिक्का तुम्हाला ग्रामपंचायत मधून लागणार आहे.
याच्याच साईडला तुम्हाला तुमचा अंगठा किंवा तुमची सही करायची आहे.
आता हा हयात दाखला तुम्ही कुठेही वापरू शकता. hayat praman patra.