रेशन कार्ड E-KYC करा नाहीतर मिळणार नाही रेशन

रेशन धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता रेशनचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड E-KYC करणे गरजेचे आहे.

जे लाभार्थी करणार नाही त्यांचे रेशन आता बंद करण्यात येणार आहे. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ही ई केवायसी करणे अतिशय गरजेचे आहे.

केवायसी ही भरपूर ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे जशी की पी एम किसान निधीचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला केवायसी करावी लागते.

जर तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी केली नाही तर तुमची रेशन सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. ई केवायसी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जे बनावटी ग्राहक आहे त्यांचे रेशन बंद करणे हा केवायसी करण्यामागचा उद्देश आहे.

बरेच ग्राहक असे आहे जे चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात किंवा काही गोंधळ करतात. याचे प्रमाण कमी करण्यासाठी ही एकेवायसी करणे आवश्यक आहे.

रेशन कार्ड E-KYC का आहे आवश्यक

रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना इ केवायसी करणे हे बंधनकारक आहे हे राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे. याबाबत सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या परिवारातील काही लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची नावे सुद्धा रेशन कार्ड मधून कमी होतील.

ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांना घेऊन दुकानदाराकडून सर्वांचा आधार क्रमांक जोडून घ्यावा लागणार आहे.

जेही दुकानदार आहे त्यांना त्यांच्या ग्राहकांची ई केवायसी तात्काळ  करण्याची आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.

ही इ केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार क्रमांक आणि तुमचा अंगठा द्यावा लागणार आहे.

एका रेशन कार्ड वर जितक्या लाभार्थ्यांची नावे आहे त्या सर्व लाभार्थ्यांना दुकानदाराकडे जाऊन ही ई केवायसी आधार मदतीने व बायोमेट्रिकच्या मदतीने इकेवायसी करणे बंधनकारक आहे.

अशा पद्धतीने होणार E-KYC

रेशन कार्ड ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या रेशन वितरण करणाऱ्या दुकानात जावे लागणार आहे दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे जी  4g ई पोस मशीनमध्ये आधार क्रमांक व बायोमेट्रिक्स च्या मदतीने ही केवायसी करण्यात येणार आहे.

ही ई केवायसी करताना लाभार्थ्यांची आधार कार्ड हे अपडेट असायला हवी तरच ही केवायसी होणार आहे नाहीतर केवायसी करताना लाभार्थ्याला अडचणी येणार आहे.

यासाठी लाभार्थ्याला सर्वात पहिले आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे ज्या लाभार्थ्यांची आधार कार्ड अपडेट नसेल त्यांनी सर्वात पहिली आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे.

रेशन कार्ड इ केवायसी ऑनलाईन पद्धत अजून आलेली नाही जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन वितरण करणाऱ्या दुकानदाराकडे जावे लागणार आहे.

जसेही यासाठी एखादी ऑनलाईन पद्धत येईल तसे तुम्हाला कळविण्यात येईल.

पीएम किसान १७ व हफ्ता

instagram

Leave a Comment