शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय चांगल्या प्रकारची बातमी या ठिकाणी आलेली आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान कशा पद्धतीची आहे व कोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
या ठिकाणी फक्त पाच हजारच नाही तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत वितरित करण्यात येणार आहे या योजना कधीपासून सुरू होणार व या योजनांचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्र विधिमंडळ म्हणजेच पावसाळी अधिवेशन 2024 अतिरिक्त महाराष्ट्र अर्थसंकल्प हे सादर करण्यात आलेले आहे. 28 जून 2024 रोजी ही माहिती सादर करण्यात आलेली आहे.
पावसाळी अधिवेशन 2024 अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 अनुदान देण्यात येणार आहे यासाठी कोणत्या अटी आहे व कोणते शेतकरी या अनुदानास पात्र आहे ही संपूर्ण माहिती बघा खालील प्रमाणे.
शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये कोणते शेतकरी आहे पात्र
खरीप पणन हंगाम सन 2023 2024 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादित पाच हजार रुपये प्रति हेक्टर इतकी अनुदान देण्यात येणार आहे.
जर तुमच्याकडे दोन दोन हेक्टर शेती असेल तर यामध्ये तुम्हाला दहा हजारापर्यंत अनुदान मिळू शकते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना जुलै 2024 पासून पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.
याच प्रमाणे गाव तिथे गोदाम ही योजना पहिले राबविण्यात आलेली होती आता या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शंभर गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे अशा घोषणा या ठिकाणी दिलेले आहे.
मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत
याच पावसाळी अधिवेशन 2024 अंतर्गत वर्षाला तीन या सिलेंडर मोफत वितरित करण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वय वर्ष 21 ते साठ वर्ष इतकी आहे अशा महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना वितरित करण्यात येणार आहे तर यासाठी एकूण 46 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे पिंक इ रिक्षा म्हणजेच दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य याठिकाणी देण्यात येणार आहे हे एकूण 17 शहरांमध्ये देण्यात येणार आहे यामध्ये 80 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत बऱ्याच कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत वितरित करण्यात येणार आहे.
यासाठी एकूण 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे.
या संपूर्ण योजना महिला सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना आहे.
याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून जी काही नवीन माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल ती सर्वात पहिले तुम्हाला कळविण्यात येईल.