इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे जी विद्यार्थी सन 2024 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना आता मोफत टॅबलेट मिळणार आहे (विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट).
जर तुमच्या घरात आहे एखादा दहावी उत्तीर्ण विद्यार्थी असेल किंवा तुम्ही एक दहावी उत्तीर्ण विद्यार्थी असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून या मोफत टॅबलेट योजना चा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता.
JEE/NEER/CET batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण हे महाराष्ट्र शासनाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
मोफत टॅबलेट योजनेचा लाभ कसा घ्यायचा कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे व अर्ज कसा करायचा व कोठे करायचा अर्ज करण्यासाठी कोणती पद्धत आहे ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचाल जेणेकरून तुम्ही सुद्धा जर या योजनेसाठी पात्र असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट कोणते विद्यार्थी आहे पात्र
या योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अर्ज करून द्यावे लागणार आहे. महाज्योती मार्फत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट 6 जीबी इंटरनेट डाटा पर डे आणि कोचिंग क्लासेस व पुस्तके मोफत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कशा पद्धतीने करायचा व कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे बघा खालील प्रमाणे.
विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
विद्यार्थी हा ओबीसी कॅटेगिरी मधील असावा विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग.
याबरोबरच विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल असावा.
2024 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेश म्हणजेच अकरावीचा प्रवेश हा विज्ञान या शाखेमध्ये असावा.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहावी मध्ये 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असावी तरच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
कोणते कागदपत्रे आहे आवश्यक
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे हे आवश्यक लागणार आहे हे कागदपत्रे कोणत्या प्रकारची आहे बघा खालील प्रमाणे.
विद्यार्थ्याचे आधार कार्ड (दोन्ही बाजूने)
रहिवासी दाखला.
जात प्रमाणपत्र.
दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका.
नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र.
विज्ञान शाखेत प्रवेश आहे याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड
दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला
अनाथ असेल तर अनाथ असल्याचे प्रमाणपत्र.
वरील हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक प्रमाणे लागणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाज्योती या अधिकृत वेबसाईटवर अर्जदाराला जावे लागणार आहे.
यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जुलै 2024 आहे यानंतर कुठलेही प्रकारची अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल ईमेलद्वारे किंवा पोस्टाने कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.