महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा

काही दिवसांपूर्वी आपण या योजनेबद्दल माहिती बघितली होती तेव्हा या योजनेची अंमलबजावणी झालेली होती मात्र या योजनेचा जीआर लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता (महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा). आता महिलांना ई रिक्षा मिळणार असून या संदर्भात जीआर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला या योजनेचा जीआर हवा असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे या बटणावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून सविस्तरपणे माहिती बघू शकता.

पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ कोणत्या महिला लाभार्थी घेऊ शकतात व कोणती कागदपत्रे आवश्यक आहे अर्ज कसा करायचा यासाठी काही अनुदान मिळणार का ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा शासन निर्णय

या योजनेअंतर्गत 17 शहरांमधील दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे असे या शासन निर्णयामध्ये कळविण्यात आलेली आहे.

ही योजना राबविणे मागचा मुख्य उद्देश म्हणजे राजुरी मुलींना व बेरोजगार महिलांना त्यांचा रोजगार उपलब्ध करून देणे आहे यासाठी त्यांना पिंक इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगार मुलींचे व महिलांचे आर्थिक सहाय्यक मजबूत होईल त्यांना एक रोजगार मिळेल.

या योजनेचा लाभ 17 शहरांमधील दहा हजार महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोणते 17 शहर पात्र ठरविण्यात आलेली आहे बघा खालील प्रमाणे.

मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर असे एकूण 17 शहर या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे.

या शहरांमध्ये एकूण किती महिला लाभारती पात्र ठरविण्यात आलेली आहे बघा खालील प्रमाणे.

मुंबई उपनगर १४०० लाभार्थी.

ठाणे १००० लाभार्थी.

पुणे १४०० लाभार्थी.

नाशिक ७००

नागपुर १४००

कल्याण ४००

अहमदनगर ४००

नवी मुंबई ५००

पिंपरी ३००

अमरावती ३००

चिंचवड ३००

पनवेल ३००

छत्रपती संभाजीनगर ४००

डोंबिवली ४००

वसई-विरार ४००

कोल्हापुर २००

सोलापुर २००

अशाप्रकारे एकूण दहा हजार महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कोणते लाभार्थी आहे पात्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थी कुटुंब ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.

जो लाभार्थी अर्ज करणार आहे त्याचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असावी.

अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख किंवा यापेक्षा जास्त नसावे.

हळदी दाराकडे वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे.

घटस्फोटीत महिला, विधवा, अनाथ व दारिद्र्य रेषेखालील महिलांना व इतर प्रकारच्या महिलांना प्राधान्य देण्यात येईल.

कोणते कागदपत्रे आहे आवश्यक.

अर्जदाराचे आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रमाणपत्र.

कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला.

पासपोर्ट फोटो.

बँक खाते पासबुक.

अर्जदाराचे ओळखपत्र.

रेशन कार्ड.

चालक परवाना ड्रायविंग लायसन्स.

परीक्षा ही महिला लाभार्थी चालवणार याची आम्ही पत्र.

योजनेअंतर्गत ज्या काही अटी व शर्ती आहे त्यांची पालन करण्याबाबत हमीपत्र.

वरील ही संपूर्ण कागदपत्रे अर्जदाराला अर्ज करताना आवश्यक तुम्हाला लागणार आहे हा अर्ज लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

या योजने संधर्भात अद्यापही अर्ज सुरु करण्यात आलेले नाही जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

जसेही या संधर्भात अर्ज सुरु करण्यात येईल तुम्हाला कळविण्यात येईल.

बांधकाम कामगार योजना

Leave a Comment