महिलांसाठी नवीन योजना या ठिकाणी राबविण्यात येत आहे या योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना असे आहे.
या विनंती करत महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ एका लाखापासून ते 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात शासनाचा अधिकृत जीआर सुद्धा निर्मित करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा म्हणून एक बटन दिलेली आहे त्या बटणावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघू शकता.
या योजनेचा लाभ कसा द्यायचा यासाठी कोणत्या महिला लाभार्थी पात्र आहे व ऑनलाईन अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
महिलांना स्वतःची उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी ही योजना अमलात आणली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना काय आहे शासन निर्णय
महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महिलांना त्यांच्या स्टार्टअप ला उद्योग धंद्याला पडवळ देणे आहे.
नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप ला विस्तारित करणे.
या योजनेअंतर्गत बऱ्याच महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर होणार आहे. याबरोबरच देशातील सर्वात जास्त महिला उद्योग स्टार्टप्स असलेले राज्य हे महाराष्ट्र राज्य असेल.
या योजनेअंतर्गत महिलांची बेरोजगारी बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे कारण बऱ्याच महिलांना त्यांचा स्वतःचा रोजगार या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
तुमच्या स्टार्टअप नुसार या ठिकाणी तुम्हाला या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे जसे की लाभार्थ्याच्या प्रारंभिक टप्प्यातील उलाढालीनुसार हा निधी 1 लाखापासून ते 25 लाखांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोणत्या महिला आहे पात्र
उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभागांतर्गत नोंदणीकृत महिला.
स्टार्टअप मध्ये महिलाच कमीत कमी 51% इतका वाटा असावा.
लाभार्थ्याचा जो काही स्टार्टर आहे तो एका वर्षे तरी चालू असावा.
स्टेटस ची वार्षिक उलाढाल दहा लाखांपासून ते एक कोटी यांच्यामध्ये असावी.
यापूर्वी जर लाभार्थ्याला महाराष्ट्र शासनाकडून एखाद्या अनुदान मिळाले असेल किंवा एखाद्या दुसऱ्या योजनेचे लाभ मिळाला असेल तर तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
असा करा ऑनलाईन अर्ज
या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे हा अर्ज तुम्ही अगदी मोफत तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://www.msins.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक बॅनर ओपन होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट योजना म्हणून त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर आता तुमच्यासमोर एक फॉर्म आलेला असेल हा फॉर्म तुम्हाला अतिशय योग्य माहिती व संपूर्ण भरायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही शुल्क भरण्याची गरज नाही हा फॉर्म अगदी मोफत या ठिकाणी तुम्ही भरू शकता.
अधिक माहिती बघण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.