लाडका भाऊ योजना अर्ज सुरू

लाडका भाऊ योजना अर्ज सुरू दिनांक ९ जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा निर्मित करण्यात आलेला होता या जीआर मध्ये बारावी उत्तीर्ण व युवकांना ६ हजार रुपये महिना व आयटीआय किंवा डिप्लोमा झालेल्या युवकांना आठ ते बारा हजार रुपये महिना मिळणार असल्याबाबत हा जीआर निर्मित करण्यात आलेला होता.

जीआर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व जीआर डाऊनलोड करण्यासाठी लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे या बटणावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या युवकांची बारावी झालेली आहे अशा युवकांना प्रति महिना सहा हजार रुपये ज्या युवकांची आयटीआय किंवा डिप्लोमा झालेला आहे अशा युवकांना 8000 रुपये व ज्यांची पदवी झालेली आहे अशा युवकांना दहा हजार रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खाते मध्ये वितरित करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्ज सुरू करण्यात आलेली आहे ज्या युवकांना ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

हा अर्ज कसा करायचा कोठे करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

लाडका भाऊ योजना कोणते लाभार्थी आहे पात्र

ग्रामीण भागातील बऱ्याच तरुणांना नोकरी नसल्याने हे तरुण युवक बेरोजगार झालेले आहे अशा बेरोजगारांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. लाडका भाऊ योजना अर्ज सुरू.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे ज्यामध्ये सहा हजारापासून ते दहा हजारापर्यंत प्रति महिना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे बघा खालील प्रमाणे.

अर्जदाराची वय हे 18 वर्षापेक्षा जास्त व 35 वर्षापेक्षा कमी असावे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदवी  पदविका व पदव्युत्तर असावी.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

लाभार्थ्याची आधार नोंदणी असावी.

कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्ताच्या स्थळावर लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी.

या सोबतच ऑनलाईन नोंदणी क्रमांक असावा.

आवश्यक कागदपत्रे

निवास प्रमाणपत्र

शैक्षणिक पात्रता

मार्कशिट

मोबाईल क्रमांक

पासपोर्ट फोटो

इमेल आयडी

असा करा ऑनलाईन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी नोंदणी करा असे एक बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव आडनाव व बाकीची काही माहिती या ठिकाणी विचारणार आहे ती माहिती योग्यरीत्या टाकायची आहे तुमचे जे नाव आणि आडनाव आहे ते तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला या ठिकाणी जन्मदिनांक आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक या चौकटींमध्ये टाकायचा आहे ही माहिती अतिशय योग्यरित्या तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे.

कॅपच्या टाकून संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्याची खात्री करून नेक्स्ट या बटणावर क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला एक ओटीपी पाठवण्यात येईल हा ओटीपी पुढील चौकटीत टाकून ओके या बटणावरती क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला जी माहिती विचारली गेली आहे ती माहिती भरायची आहे.

वरील माहिती संपूर्ण रित्या भरल्यानंतर आता तुमची आयडी या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी फॉर्म भरू शकता.

कर्ज योजना

Leave a Comment