मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024

शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे.

या संदर्भात दिनांक 25 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे. हा जीआर महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनीकर्म या विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय बघायचं असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे एक बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

मुख्यमंत्री मोफत वीज योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे ही वीज शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी असणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासन निर्णय बघा.

महाराष्ट्र राज्यामध्ये मार्च 2024 च्या आखेरपर्यंत 47.41 इतके कृषी पंप ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरण तर्फे वीज पुरवठा करण्यात येते.

एकूण 30 टक्के ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी करण्यात येतो.यापैकी एकूण 39 हजार 246 दस लक्ष्य युनिट हा ग्राहकांचा वार्षिक वापर आहे. शेतकऱ्यांना जर या विजेचा वापर करायचा असेल तर यासाठी त्यांना काही ठराविक टाईम दिलेला असतो जसे की विद्युत पंप वापरण्यासाठी 3 फेज वीज ही फक्त 8 किंवा 6 तास असते.

पावसाळ्यात हवामान हे खूपच बदलते त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यासाठी वीज उपलब्ध राहत नाही. यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.

ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाकडून ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना गी राबविण्यात येत आहे. सादर योजनेचा कालावधी हा एकूण 5 वर्ष इतका राहणार आहे.

राज्यातील जे शेतकरी 7.5 hp पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत देण्यात येणार आहे.

या योजनेचा कालावधी हा 5 वर्ष म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत असणार आहे. यामध्ये 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर ते बदल करू शकतात या योजनेचा आढावा घेऊन.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अट आहे आणि ती अट म्हणजे लाभार्थी हा 7.5 hp पर्यंतचा ग्राहक असावा. ही माहिती दिनांक 25 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेल्या जीआर मध्ये कळविण्यात आलेली आहे.

जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर खालील बटणावर क्लिक करून तुम्ही हा जीआर डाऊनलोड करू शकतात.या योजेसाठी सर्वच शेतकरी पात्र आहे ज्याचे विद्युत पंप हे 7.5 hp पर्यंत आहे.

महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजना

Leave a Comment