मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मिळणार मोफत गॅस जीआर बघा

महिलांसाठी आता ही अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मिळणार मोफत गॅस. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे आहे या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन गॅस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे जर तुम्हाला जीआर डाऊनलोड करून संपूर्ण अधिकृत माहिती बघायची असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे या बटनावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

कशी आहे योजना बघा संपूर्ण माहिती.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र कुटुंबांना वार्षिक तीन गॅस पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहेत म्हणजेच तीन वेळेस मोफत गॅस मिळणार आहे.

अशी माहिती दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यामागे कोणते उद्देशी आहे व यासाठी कोणते कुटुंब पात्र ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जीआर बघा

महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी अजूनही या प्रकाराचा वापर करण्याचा यामध्ये लाकडे व कोळसे जाळण्यात येतात.

यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर उत्पन्न होतो हा धूर शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी दोन्हींसाठी वर हानिकारक असतो आणि ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील पात्र कुटुंबांना वार्षिक तीन गॅस पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना व तसेच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही तीन मोफत गॅस देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना चे राज्यात एकूण लाभार्थी 52.16 लक्ष आहे इतक्या पात्र लाभार्थ्यांना हे वार्षिक तीन गॅस पुनर्भरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच जे लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र झालेले आहे त्यांना सुद्धा हे वार्षिक तीन गॅस पुनर्भरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लाभार्थ्याची पात्रता बघा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी जी आहे ती कुटुंबाच्या महिला सदस्याच्या नावाने असावी.

सद्यस्थितीमध्ये या योजनेसाठी 52.16 लाख इतकी लाभार्थी पात्र आहे हे लाभार्थी प्रधानमंत्री उज्वला योजनेची आहे.

ज्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत हफ्ता मिळेल असे लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी पात्र असणार आहे (रेशन कार्ड नुसार).

या योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्राम वजनाच्या जोडणी असलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

योजनेची कार्यपद्धत बघा

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या कोणत्या तेल कंपन्या करत आहे त्याच तेल कंपन्या आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संदर्भातील हे मोफत सिलेंडर पुनर्भरण करून देणार आहेत.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून 830 रुपये इतकी किंमत गॅस पुनर्भरणची घेतली जाते व तीनशे रुपये सबसिडी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे तीनशे रुपये जमा करून देण्यात येते.

आता ही रक्कम अंदाजी 530 रुपये इतकी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एका महिन्यामध्ये एकाच वेळेस गॅस सबसिडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही किंमत थोडीफार कमी जास्त असू शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा अशाच प्रकारची कार्यपद्धत आहे यामध्ये फक्त थोडीफार बदल करण्यात आले आहे हे बदल कशाप्रकारे आहे व कोणत्याही संपूर्ण माहिती सुद्धा बघू शकता.

कांदाचाळ अनुदान योजना

Leave a Comment