मागेल त्याला सोलर पंप

मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत तीन ते चार वर्षांमध्ये जवळपास आठ लाख सोलार पंप उभारणीचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख पंपांचे वितरण करण्यात आलेले आहे.

महावितरण कंपनीकडून बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा कोणत्या वेबसाईटवर करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण जर विजेच्या भरोशावर म्हणलं तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी खूप अडचणी येतात कधी दिवसभर विज असते तर कधी रात्री असते यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

जर शेतकऱ्यांकडे सोलर पंप असेल तर शेतकरी जेव्हा पाहिजे तेव्हा विजेचा वापर करू शकतो त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहे. मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.

मागेल त्याला सोलर पंप  असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुसुम महाऊर्जा या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक सूचना दिसेल ती सूचना वाचून समजून घेऊन बंद करायची आहे.

यापूर्वी अर्जदाराने कुठल्याही योजनेअंतर्गत सोलर पंपाचा लाभ घेतलेला नसावा असल्यास अर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व अर्ज बाद सुद्धा करण्यात येईल अशी सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे.

आता तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशनची पेज येईल. जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पंपाविषयी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे यानंतर तुम्हाला हमीपत्र भरायचे आहे की यानंतर मी डिझेल पंपाचा वापर करणार नाही.

यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला डिझेल पंप यूजर आहे की नाही हा पर्याय विचारला जाईल. यानंतर तुम्हाला खाली तुमचे वैयक्तिक माहिती विचारला जाईल जसे की खालील प्रमाणे.

या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक राज्य जिल्हा तालुका गाव मोबाईल क्रमांक कास्ट कॅटेगिरी व ईमेल आयडी विचारण्यात येईल वरील विचारलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी योग्यरीत्या भरायची आहे.

या ठिकाणी संपूर्ण माहिती योग्य रिका भरल्यानंतर आता तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काही सूचना सुद्धा दिलेले असणार आहे या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या आणि या पंपाचा कशाप्रकारे तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे ही माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे.

या ठिकाणी फक्त तुम्हाला सहा रुपयाची पेमेंट करावे लागणार आहे यासाठी की तुम्हाला पंधरा मिनिटे वेळ दिला जाणार आहे. पेमेंट करत असताना तुम्हाला या ठिकाणी बिलिंग नावाचा एक बॉक्स दिसेल यामध्ये तुम्हाला ज्या लाभार्थ्याच्या नावावर अर्ज करत आहात त्या लाभार्थ्याचे संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी भरायचा आहे.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत मग पृष्ठावर फ्री डायरेक्ट केला जाईल. जी माहिती तुम्ही अगोदर भरली की ती संपूर्ण माहिती तुम्हाला परत या ठिकाणी भरायची आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी जमिनीची माहिती विचारली जाईल यासाठी तुम्हाला चार मिनिटांचा कालावधी दिला जाईल.

ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे. तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या ठिकाणी टाका.

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या मेसेज वर आयडी आणि पासवर्ड पाठवून घेईल तो आयडी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगिन करायचे आहे.

लॉगिन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इनकंप्लीट फॉर्म जर दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज सादर करावा लागणार आहे.

या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती चेक करताना खाली तुम्हाला कोणता पंप हवा किती एचपी चा हवा व तुमच्या बँक संदर्भात संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.

महत्त्वाचे कागदपत्रे

सातबारा

बँक पासबुक

पासपोर्ट साईज फोटो

या कागदपत्रांची दोन एमबी पर्यंत असावी.

ऑनलाईन ई पीक पाहणी

Leave a Comment