राज्यातील शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करण्यासाठी बॅग देण्यात येणार आहे यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. हे अनुदान कश्या पद्धतिने देण्यात येणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
राज्यामध्ये जे शेतकरी कापूस उत्पादक आहे त्याच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करण्यासाठी प्रती हेक्टरी ८ बॅग अशा प्रकारे या बॅग चे वितरण करण्यात येणार आहे.
या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्क लागणार आहे आणि अर्ज कोणत्या कोठे करायचा ही संपूर्ण माहिती याठिकाणी आपण बघणार आहोत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महा डीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सदर करावा लागणार आहे. हे अनुदान कृषी विभागाच्या सहाय्याने देण्यात येणार आहे.
कापूस साठवणूक बॅग अनुदान असा घ्या लाभ.
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे याच या अंतर्गत ही एक योजना आहे २०२२ ते २०२५ च्या आर्थिक वर्षामध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यासाठी एकूण खर्च १००० कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला १ एकरसाठी ३ बॅग २ एकर साठी ६ बॅग आणि १ हेक्टर साठी जास्तीत जास्त ८ बग एक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. या या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ ऑगस्ट च्या आत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
कापूस उत्पादकता आणि विशेष मूल्य साखळी योजना ही फक्त कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविली जाते. तिथल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचा तालुका हा कापूस उत्पाद तालीक्यामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा बघा खालीलप्रमाणे.
असा करा ऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणर आहे.
डीबीटीवर तुम्हाला तुमचा लॉगीन आयडी आणि password टाकून लॉगीन करायचे आहे. अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
आता तुम्हाला याठिकाणी बरेच पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला बियाणे, औषधे व खाते या समोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
आता या ठिकणी तुम्हाला एक फोर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या बद्धलची माहिती भरायची आहे. जसे की लाभार्थ्याचा तालुका गाव गट क्रमांक.
बाब निवडामध्ये साठवणूक सुविधा हा पर्याय निवडा.
पीक कापूस निवडा. यानंतर अनुदान हवे असलेली बाब मध्ये कापूस साठवणूक बॅग हा पर्याय निवडा.
एकूण क्षेत्र किती आहे ते निवडा हेक्टर आणि आर मध्ये.
ही माहिती भरल्या नंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
जर तुमचा तालुका यासाठी पात्र असेल तर तुम्हाला कळविण्यात येईल अथवा या ठिकाणी तुम्हाला काही तृटी दाखविण्यात येईल.
आता तुमचा अर्ज हा भरल्या गेला आहे परत तुम्हाला मुखपृष्टावर जायचे आहे आणि अर्ज सदर करा या बटनावर क्लिक करून प्राधान्य क्रम द्यायचा आहे.
अशा प्रकरे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.