सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज सुरु

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे यासंधर्भातचा जीआर सुद्धा आपण यापूर्वी बघितलेला आहे. जीआरमध्ये अनुदान कशा प्रकारे वितरीत करण्यात येणार आहे या संधर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नसून आता या अनुदानासाठी अर्ज सुरु करण्यात आलेले आहे.

हे परिपत्रक हमीपत्र आणि नाहरकत लेखाच्या शेवटी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे लेखाच्या शेवटी डाउनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता.

हा अर्ज कसा भरायचा यासाठी काही पात्रता लागणार आहे का आणि हा अर्ज कोणते शेतकरी भरू शकता ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा हा अर्ज भरू शकाल.

सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज सुरु परिपत्रक बघा.

दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे जर तुम्हाला हे परिपत्रक आणि अर्ज pdf मध्ये डाऊनलोड करायचे असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला दिलेले आहे येथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

या परिपत्रकाचा विषय म्हजेच जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे खरीप हंगाम २०२३ मधील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे.

ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३ मध्ये खरीप हंगाम ई पीक पाहणी सोयाबीन आणि कापूस या पिकांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला हे अनुद्ना तुमच्या बँक खात्यामध्ये घायचे असेल तर यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे.

पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान वितरीत करण्याआधी त्यांच्या आधार संधर्भात माहिती वापरण्यासाठी समती पत्र आणि सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदाराला रक्कम वितरीत करण्याबाबत नाहरकत पत्राचा नमुना तुम्हाला या अर्जासोबत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अर्ज करताना तुम्हाला हे हमीपत्र आणि जर तुमचे क्षेत्र समायिक असेल तर नाहरकत पत्र याठीकानी दिलेले आहे तुम्हाला यावर तुम्ही स्वाक्षरी कराची आहे.

संमतीपत्र

याठिकाणी तुम्हाला जिल्हा तालुका गाव आणि शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार नुसार मराठी आणि इंग्रजीमध्ये भरायचे आहे आणि आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक (इंग्रजीमध्ये) टाकायचा आहे. दिनांक टाकून आणि अर्जदाराची स्वाक्षरी किंवा नाव टाकून हे संमतीपत्र कृषी सहाय्याकडे जमा करायचे आहे.

अशाच प्रकारे सामायेक खातेदार नाहरकत पत्र सुद्धा आहे. ही माहिती भरणे अतिशय सोपी आहे जर तुम्हाला हे परिपत्रक डाऊनलोड करायचे असेल तर खलील बटनावर क्लिक करून तुम्ही हे परिपत्रक डाऊनलोड करू शकता.

cotton bags

Leave a Comment